दिल्लीत पडद्याआड घडामोडी, विधान परिषदेसाठी काँग्रेसच्या संभाव्य चार उमेदवारांची नाव आली समोर

महाराष्ट्रात विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. विधान परिषदेवर 11 सदस्यांना निवडून पाठवण्यात येणार आहे. काँग्रेस विधान परिषदेच्या तीन जागा लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी कुठल्या चार उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली, ती नाव समोर आली आहेत. दिल्लीत काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत.

दिल्लीत पडद्याआड घडामोडी, विधान परिषदेसाठी काँग्रेसच्या संभाव्य चार उमेदवारांची नाव आली समोर
नाना पटोलेImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jun 25, 2024 | 2:49 PM

(संदीप राजगोळकर) महाराष्ट्रात लवकरच विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. पुढच्या महिन्यात महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागा रिक्त होणार आहेत. निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. आजपासून 2 जुलै पर्यंत अर्ज भरण्याची मुदत असणार आहे. याच विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची दिल्लीत खलबत झाली. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत दिल्लीत चर्चा केली. काँग्रेस विधान परिषदेच्या 11 पैकी 3 जागा लढवणार आहे. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि विधान परिषद उमेदवारांची नाव निश्चित करण्यासाठी काल रात्री उशिरा नाना पटोले दिल्लीत दाखल झाले.

काँग्रेसच्या बैठकीत ज्या संभाव्य उमेदवारांच्या नावाची चर्चा झाली, त्यांची नाव टीव्ही 9 मराठीकडे आली आहेत. माणिकराव ठाकरे, नसीम खान, काकासाहेब कुलकर्णी आणि संध्या सव्वालाके या चार उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली. माणिकराव ठाकरे यांनी महाराष्ट्रात काँग्रेसची महत्त्वाची पद भूषवली आहेत. नसीम खान हे महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार असताना मंत्री होते. आता काँग्रेस चौघांपैकी कुठल्या तीन उमेदवारांना संधी देते, ते लवकरच समजेल.

बैठकीसाठी महाराष्ट्रातून कुठले नेते दिल्लीत?

दरम्यान थोड्याच वेळात काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. काँग्रेस मुख्यालयात ही महत्त्वाची बैठक होणार आहे. विधानसभा निवडणुकांची तयारी आणि विधान परिषद निवडणुकीबाबत या बैठीकत चर्चा होईल. बैठकीसाठी नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, सुनील केदार आणि यशोमती ठाकूर दिल्लीत दाखल झाले आहेत. आज दुपारी चार वाजता राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत होणार बैठक होईल.

मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.