डेलकर आत्महत्या प्रकरणावरून गृहखातं काँग्रेसच्या रडारवर?; मंत्रिमंडळाच्या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपणार?
खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाचे आज होणाऱ्या राज्य मंत्रिमडळाच्या बैठकीत पडसाद उमटण्याची शक्यता आहे. (congress will raise mohan delkar death issue in cabinet meeting)
मुंबई: खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाचे आज होणाऱ्या राज्य मंत्रिमडळाच्या बैठकीत पडसाद उमटण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे डेलकर आत्महत्याप्रकरणात गृहखात्याकडून वेगाने तपास होत नसल्याचा सूर काँग्रेसने आळवला आहे. त्यावरून दोन्ही काँग्रेसमध्ये आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जुंपण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणावरून गृहखातं आता काँग्रेसच्या रडारवर आल्याचं बोललं जात आहे. (congress will raise mohan delkar death issue in cabinet meeting)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. भाजप विविध प्रकरणात महाविकास सरकारला लक्ष्य करीत असताना डेलकर यांनी आत्महत्येआधी लिहलेल्या पत्रात अनेक मोठ्या हस्तीची नावे असूनही त्याबाबत गृहखाते मौन बाळगून असल्या बद्दल काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे बैठकीत हा विषय जोरदारपणे उचलायचा किंवा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीच भेट घेऊन आपले म्हणणे मांडायचे, अशी रणनीती काँग्रेसने आखल्याचं सूत्रांनी सांगितलं. डेलकरआत्महत्या प्रकरणाचा तपास गृहखात्याकडून वेगाने होत नसल्याचा आरोपही काँग्रेस नेत्यांनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीची कोंडी करण्यासाठीच काँग्रेसकडून डेलकर मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उचलण्यात येत असून ठाकरे सरकावर दबाव वाढवण्यासाठीच काँग्रेसची ही खेळी असल्याचं बोललं जात आहे.
काँग्रेस नाराज का?
पालघर मॉब लिंचिंग आणि सुशांतसिंग राजपूत मृत्यूप्रकरणावरून विरोधकांनी रान उठवलं होतं. रेणू शर्मा प्रकरणावरून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांनी टीका केली होती. त्यानंतर पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. नंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे मॉर्फ फोटो व्हायरल झाल्यानेही विरोधकांनी गृहखात्यावर टीका केली होती. आता मनसुख हिरेन प्रकरणातही विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. या सर्व प्रकरणात गृहखात्याने पाहिजे तितक्या तत्परतेने काम केलं नाही. पोलिसांनी मीडियाला माहिती दिली नाही. त्यातच विरोधकांनी ही प्रकरणं लावून धरल्याने सरकारची प्रतिमा मलिन होऊन बदनामी झाली. मोहन डेलकर प्रकरणातही गृहखात्याने वेगानं काम केलं नाही. त्यामुळे सरकारची प्रतिमा आणखीनच मलिन झाली आहे. त्यामुळेच काँग्रेसने गृहखात्यावर वेगाने काम करत नसल्याचा आरोप केला आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते
जशी पूजाने आत्महत्या केली तशी खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली. यात महिला आणि पुरुष हा एक फरक आहे. पण डेलकर यांनी आत्महत्या केल्याने त्यांचंही घर उघडं पडलंय. त्यांच्या पत्नी निराधार झाल्यात. त्याही महिलाच आहेत. त्यांची बाजू कोण का मांडत नाही. त्यांच्यासाठी कोणी रस्त्यावर का उतरत नाही, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. डेलकर आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस त्यांचा तपास करेलच. मात्र, तो केंद्रशासित प्रदेश आहे. त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना विनंती करतो की त्यांनी तेथील प्रशासनाला मुंबई पोलिसांना सहकार्य करण्यास सांगावं. डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये कुणाची नावं आहेत ती तपासाच्या मार्गाने येऊ द्यात. भाजपने काहीतरी वेडेपणा केला म्हणून मी तसं करणार नाही. या प्रकरणात आम्ही वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक करु,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. (congress will raise mohan delkar death issue in cabinet meeting)
LIVE : महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/EqmNZS3UMz
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 5, 2021
संबंधित बातम्या:
डेलकरांच्या सुसाईड नोटमध्ये नावे असलेल्यांविरोधात गुन्हे दाखल करा; नाना पटोले यांची मागणी
तब्बल सातवेळा संसदेवर, खासदार मोहन डेलकर यांची मुंबईतील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या
(congress will raise mohan delkar death issue in cabinet meeting)