मुंबई : एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) आपल्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आता राज्यात सत्तास्थापन करण्याच्या हालचालींमध्ये वाढ झालीये. एकनाथ शिंदे यांच्याकडे 40 आमदारांचा पाठिंबा असेल तर महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतांमध्ये आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी गटनेता पद वैध नसल्याचे म्हटंले आहे. मात्र, यासंदर्भात घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी महत्वाची माहिती सांगितली. उल्हास बापट म्हणाले की, गटनेते पदाची जी निवड (Selection) करण्यात आलीये, ती योग्य आणि वैध आहे, कारण एकनाथ शिंदेंकडे जरी आता बहुमताचा आकडा असेल तरीही तो अजून सिध्द झालेला नाहीये.
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर राजकिय पेच निर्माण झालायं. शिंदे यांनी त्यांच्याकडे 40 आमदार असल्याचा दावा केला. भाजपाचे आमदार आणि एकनाथ शिंदेंसोबत असलेले 37 आमदार मिळून सत्तास्थापन करू शकतात, असेही उल्हास बापट म्हणाले आहेत. यानुसार देवेंद्र फडणवीस यांना उरलेले अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर राहता येईल. दोन तृतीआंश आमदारांपेक्षा जास्त संख्याबळ हे एकनाथ शिंदेसोबत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळेच सत्तास्थापनेचा भाजपसोबत दावा एकनाथ शिंदे करतील. भाजपाने देखील आपल्या आमदारांना मुंबईत दाखल होण्याचे आदेश दिलेत.
एकनाथ शिंदे आणि भाजपाने जर बहुमत सिध्द केले तर उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. जर त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला तर सर्व अधिकार हे राज्यपालांकडे असतील. यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट देखील लागू शकते आणि राज्यात सहा महिन्यांच्या अगोदरच निडणूका देखील घ्याव्या लागतील. राज्यपाल कोश्यारींना कोरोनाची लागण झालीये, त्यांना रूग्णांलयामध्ये दाखल केले आहे. राज्यातील सध्याची संपूर्ण परिस्थिती बघता, महाविकास आघाडी सरकारला धोक्यात असल्याचे चित्र आहे.