‘कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला नाही तर क्वारंटाईन करणार’, राष्ट्रवादीच्या आमदाराचा मतदारसंघातील जनतेला इशारा!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लागण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी एक अजब फतवा काढला आहे. कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला नाही तर नागरिकांना क्वारंटाईन करणार असल्याचा इशाराच शेळके यांनी दिलाय.

'कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला नाही तर क्वारंटाईन करणार', राष्ट्रवादीच्या आमदाराचा मतदारसंघातील जनतेला इशारा!
सुनील शेळके, आमदार
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 12:26 AM

पुणे : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव (Corona Outbreak) मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. अशावेळी ओमिक्रॉनबाधित रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध (Corona Restrictions) लागण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी एक अजब फतवा काढला आहे. कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला नाही तर नागरिकांना क्वारंटाईन करणार असल्याचा इशाराच शेळके यांनी दिलाय.

आमदार सुनील शेळके यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांना कोरोना लस घेण्याचं आवाहन केलं आहे. मावळमध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या 100 टक्के असल्याचं सांगितलं जातंय. मात्र, कोरोना दुसरा डोसकडे मतदारसंघातील नागरिक पाठ फिरवत असल्याचं शेळके यांच्या निदर्शनास आलं. त्यामुळे कोरोना लसीचा दुसरा डोर घेतला नाही तर त्या व्यक्तीला क्वारंटाईन करणार असल्याचा इशारा शेळके यांनी दिलाय. यासाठी शेळके यांनी मतदारसंघातील नागरिकांना कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी 15 जानेवारीपर्यंतचा अल्टिमेटमही दिल्याची माहिती मिळत आहे.

सुनील शेळकेंच्या फतव्यावर अजितदादांची प्रतिक्रिया काय?

दरम्यान, सुनील शेळके यांच्या या फतव्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, त्यांनी त्यांच्या तालुक्यात केलं असेल. मी आताच सांगितलं की आम्ही लसीबाबत कठोर भूमिका घेतली आहे. लोकांनी त्याला प्रतिसाद द्यावा, याबाबत गैरसमज करुन घेऊ नये. कारण सर्वांच्या फायद्यासाठी, हितासाठीच हा निर्णय घेतला आहे.

पुण्यात 1ली ते 8वी पर्यंतच्या शाळा बंद

पुणे शहर आणि जिल्ह्यातील 1ली ते 8वी पर्यंतच्या शाळा 30 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वर्गांचे ऑनलाईन क्लास सुरु राहतील. तर 9वी आणि 10वीचे वर्ग ऑफलाईन पद्धतीनेच सुरु राहणार आहेत. कारण, या वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करायचे आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिलीय. तर उद्या, परवापर्यंत कॉलेजबाबतचा निर्णय होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

‘नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’

उद्यापासून पुणे जिल्ह्यात सर्वत्र मॉल, खासगी तसंच सरकारी कार्यालयात कोरोना लसीचे दोन्ही डोस झाले नसतील तर प्रवेश मिळणार नाही. नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस खात्याला सक्त सूचना दिल्याचही अजितदादा म्हणाले.

मास्क नसेल तर दंड

इतकंच नाही तर पुण्यात उद्यापासून तोंडावर मास्क लावलेला नसेल तर 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. त्याचबरोबर तोंडावर मास्क नसेल आणि तो व्यक्ती रस्त्यावर थुंकला तर त्याला 1 हजार रुपये दंड केला जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 5 जानेवारीपासून होणार असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा कहर, दिवसभरात 18 हजारापेक्षा अधिक रुग्ण, 20 जणांचा मृत्यू

Sindhutai Sapkal : हजारो लेकरं पोरकी झाली, अनाथांची माय काळाच्या पडद्याआड

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.