हिवाळी अधिवेशनात कोरोनाचा शिरकाव, समीर मेघे कोरोना पॉझिटिव्ह, अधिवेशन गुंडाळावं लागणार?

आता भाजप आमदार समीर मेघेंच्या संपर्कात आलेल्या इतर आमदारांचीही कोरोना चाचणी करावी लागणार आहेत. त्यातून कुणी पॉझिटिव्ह आढळतं का, हे चाचणीचे अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल.

हिवाळी अधिवेशनात कोरोनाचा शिरकाव, समीर मेघे कोरोना पॉझिटिव्ह, अधिवेशन गुंडाळावं लागणार?
भाजप आमदार समीर मेघे कोरोना पॉझिटिव्ह
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 9:08 PM

नागपूर : वाढत्या ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येतच आता हिवाळी अधिवेशनातही कोरोनानं शिरकाव केलाय. भाजप आमदार समीर मेघे (BJP MLA Sameer Meghe) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात (Winter Session) समीर मेघे यांची भेट घेतलेले इतरही आमदार आता धास्तावले आहेत. समीर मेघे यांनी स्वतः आपल्याला कोरोनाची लागण (Corona Positive) झाली असल्याची माहिती दिली आहे. फेसबुक पोस्ट (Facebook post) लिहीत त्यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याचं म्हटलंय.

उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

कोरोनाची लागण झाल्याचं कळताच समीर मेघे हे रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाले आहेत. नागपुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. प्रकृती बिघडल्यानं समीर मेघे पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले असल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान, ऐन हिवाळी अधिवेशनात सभागृहातीलच एक आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं सगळ्याच आमदारांची चिंता वाढली आहे.

22 तारखेला समीर मेघे हे विधानसभा अधिवेशनासाठी सभागृहात हजर होते. यावेळी त्यांनी विधानसभेत इतरही आमदार आणि मंत्र्यांची भेट घेतली होती. त्यामुळे आता त्यांच्या संपर्कात आलेल्या आमदार, विधानसभेतील कर्मचारी वर्ग यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार आहे. यातूनही इतरांना संसर्ग झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मेघेंच्या संपर्कात कोण आलं?

ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार सतर्क झालं आहे. अनिल परब यांनी विधानसभेत रात्रीच्या वेळी जमावबंदी करण्याचा निर्णय सरकार घेत असल्याची माहिती दिली होती. यानंतर आता सभागृहातीलच आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानं अधिवेशन कसं पार पडतं, हे पाहणंही महत्त्वाचं आहे. सोमवारी विधानसभेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रकिया सुरु होणार आहे. तर मंगळवारी विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी मतदान पार पडणार आहे.

अधिवेशनाचं काय?

दरम्यान, आता भाजप आमदार समीर मेघेंच्या संपर्कात आलेल्या इतर आमदारांचीही कोरोना चाचणी करावी लागणार आहेत. त्यातून कुणी पॉझिटिव्ह आढळतं का, हे चाचणीचे अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. मात्र इतरही आमदार पॉझिटिव्ह आढळून आले, तर नेमका काय निर्णय या हिवाळी अधिवेशनाबाबत घेतला जातो, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

इतर बातम्या –

Omicron in Aurangabad: औरंगाबादेत ओमिक्रॉनचा शिरकाव, इंग्लंड, दुबईहून आलेल्या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह!

पुणे जिल्ह्यात नवी नियमावली लागू, काय असतील नवे निर्बंध? वाचा सविस्तर

Rajesh Tope: राज्यात लॉकडाऊन कधी लागणार?; राजेश टोपेंनी सांगितलं नेमकं गणित

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.