Maharashtra politics : शिवसेनेला आणखी एक धक्का; ठाणे, नवीमुंबई नंतर कोकणातील नगरसेवकही शिंदे गटात!
शिवसेनेला (shivsena) धक्क्यावर धक्के बसत आहेत. ठाणे (Thane), नवी मुंबई पाठोपाठ कोकणातील नगरसेवकांनी देखील शिंदे गटाचा रस्ता धरला आहे.
रत्नागिरी : शिवसेनेला (shivsena) धक्क्यावर धक्के बसत आहेत. ठाणे (Thane), नवी मुंबई पाठोपाठ कोकणातील नगरसेवकांनी देखील शिंदे गटाचा रस्ता धरला आहे. दापोली आणि मंडणगडमधील नगरसेवकांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दिल्याचे वृत्त समोर येत आहे. मुंबईमध्ये योगेश कदम यांच्या नेतृत्वात 11 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यामध्ये मंडणगडमधील आठ तर दापोलीमधील तीन शिवसेना नगरसेवकांचा समावेश आहे. विनोद जाधव, मुश्ताक दाभिळकर, योगेश जाधव, प्रमिला किंजळे, स्नेहल गुवळे, सापटे, प्रविण जाधव अशी मंडणगडमधील नगरसेवकांची नावे आहेत. तर शिवानी खानविलकर आणि प्रति शिर्के या दापोलीमधील नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिलल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी ठाणे आणि नवी मुंबईमधील अनेक नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आडचणीत वाढ होताना दिसत आहे.
ठाण्यातील नगरसेवकांचा शिंदेंना पाठिंबा
दरम्यान सात जुलैरोजी ठाण्यातील 67 पैकी 66 माजी नगरसेवक हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे ठाण्यात शिवसेनेमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दिला. ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईतील काही नगरसेवकांनी शिंदेंना पाठिंबा दिला आहे. राज्याच्या अनेक प्रमुख महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामध्ये मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद अशा अनेक महत्त्वाच्या महापालिकांचा समावेश आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
विश्वनाथ भोईल यांची हकालपट्टी
आमदार विश्वनाथ भोईर यांची शिवसेनेच्या कल्याण शहरप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. विश्वनाथ भोईर हे शिवसेनेचे कल्याण पश्चिमचे आमदार आहेत. मात्र ते शिंदे गटात सहभागी झाल्याने त्यांना आता शिवसेनेच्या कल्याण शहरप्रमुख पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी सचिन बासरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिन बासरे यांचा देखील दांडगा जनसपर्क असून, ते शिवसेनेचे तीन टर्म नगरसेवक राहिले आहेत. शिवसेनेकडून शिंदे गटात गेलेल्या सर्वच आमदारांवर कारवाई करण्यात येत आहे. माजी आमदार विजय शिवतारे यांची देखील पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.