Nawab Malik : ‘मलिकांचा डी-गँगशी संबंध’, कोर्टाचं निरीक्षण! नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Nawab Malik Ed News : नवाब मलिक यांच्यावरून राज्याच्या राजकारणात अजूनही जोरदार घमासान सुरू आहे.

Nawab Malik : 'मलिकांचा डी-गँगशी संबंध', कोर्टाचं निरीक्षण! नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
नवाब मलिकांबाबत मोठी अपडेटImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 8:50 AM

मुंबई : नवाब मलिक (Nawab Malik ED News) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांचे डी गँगसोबत संबंध होते, असं निरीक्षण कोर्टानं नोंदवल्यांचं सांगण्यात येतंय. मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीनं (ED on Nawab Malik) चार्जशीट दाखल केली होती. गोवावाला कंपाऊंड मिळवण्यासाठी कट रचल्याचा ठपका ईडीनं नवाब मलिकांवर ठेवलाय. मंत्री नवाब मलिक यांनी हसीना पारकरसोबत (Haseena Parkar & Nawab Malik) वारंवार बैठका घेतल्या आणि मनी लॉड्रिंग केलं, असं प्राथमिक निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे. रोकडे यांच्या खंडपिठानं हे निरीक्षण नोंदवलं आहे. नवाब मलिक यांचा दाऊदच्या गँगमधील लोकांसोबत संबंध असल्याचं निरीक्षण नोंदवलं गेल्यानं आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

हसीना पारकर, सरदार शाहवली खान यांच्यासोबत नवाब मलिक यांच्या बैठका झाल्या असल्याचा ठपका ईडीनं नवाब मलिक यांच्यावर ठेवलाय. ‘मलिक हे हसीना पारकर, सलीम पटेल, सरदार शहावली खानच्या संपर्कात होते’ असा आरोप करण्यात आलंय. D गँगशी संबंध ठेवूनच मलिकांनी गोवावाला कंपाऊंडची जागा मिळवल्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर आहे.

पाहा व्हिडीओ : नवाब मलिक यांच्या संदर्भातली मोठी बातमी

मलिक प्रकरणात ईडी चार्जशीटमध्ये काय?

  1. गोवावाला कंपाऊंडच्या व्यवहारात मलिकांचा डी-गँगशी संबंध, कोर्टाचं निरीक्षण
  2. मलिकांचा दाऊदच्या लोकांशी संबंध असल्याचे सुकृतदर्शनी पुरावे
  3. गोवावाला कंपाऊंडच्या जागेसाठी मलिकांनी दाऊदच्या लोकांशी बैठका केल्या
  4. हसीना पारकर, सरदार शाहवली खान यांच्यासोबत मलिकांच्या बैठका झाल्या
  5. गोवावाला कंपाऊंड मिळवण्यासाठी मलिकांनी गुन्हेगारी कट रचला
  6. नवाब मलिकांविरोधात मनीलाँड्रिंगचे पुरावे आढळलेत, ईडीचा दावा
  7. गोवावाला कंपाऊंड मुनिरा प्लंबर आणि तिच्या कुटुंबाच्या मालकीचं
  8. हसीनाने फसवणूक करून मलिकांसाठी मालमत्तेचे मालकी हक्क मिळवले
  9. मलिकांचा मुलगा फराज आणि इतर दोघांनी पारकरच्या सहयोगीशी भेट घेतली
  10. त्यांनी 5 लाखांची रोख रक्कम आणि 5लाखांचा चेक दिला, पारकर, मलिक यांनी दाऊदटोळीला आर्थिक मदत केल्याचा आरोप

मलिकांच्या राजीनाम्याची मागणी

नवाब मलिक यांच्यावरून राज्याच्या राजकारणात अजूनही जोरदार घमासान सुरू आहे. नवाब मलिक यांचा दाऊदशी संबंध आहे, असा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात आलाय. तर ही कारवाई सूडबुद्धीने आणि भाजपच्या सांगण्यावर करण्यात आहे, असा आरोप महाविकास आघाडीचे नेते करतायत.

राष्ट्रवादीचा दुसरा मंत्री जेलमध्ये गेल्याने महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय. नवाब मलिक यांनी गैरव्यववहार केला आणि तो पैसा थेट दाऊदकडे गेले, असा आरोप करत हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे, असा भाजपनं म्हटलंय. त्यामुळे मलिकांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात येतेय.

मलिकांवर रुग्णालयात उपचार

गेल्या अनेक दिवसांपासून जेलमध्ये असणार मंत्री नवाब मलिक यांना खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत. त्यांच्यावर किडनी आणि इतर व्याधींबाबत उपचार केले जात आहेत. मलिक यांना सध्या कुर्ल्यातील क्रिटी केअर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. मलिकांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याची परवागी देण्यात यावी अशी मागणी ईडी कोर्टात करण्यात होती. त्यानंतर ईडी कोर्टाने त्यांना ही परवानगी दिल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.