एक पूल, दोन लेन आणि तीन दावेदार, कल्याणमध्ये शिवसेना-भाजप आणि मनसेत रंगली श्रेयवादाची लढाई

एक पूल, दोन लेन आणि तीन दावेदार ही अवस्था आहे, कल्याणच्या दुर्गाडी खाडी पूलाची (credit war over Durgadi new creek bridge between Shivsena and BJP and MNS).

एक पूल, दोन लेन आणि तीन दावेदार, कल्याणमध्ये शिवसेना-भाजप आणि मनसेत रंगली श्रेयवादाची लढाई
एक पूल, दोन लेन आणि तीन दावेदार, कल्याणमध्ये शिवसेना-भाजप आणि मनसेत रंगली श्रेयवादाची लढाई
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 3:13 PM

कल्याण : एक पूल, दोन लेन आणि तीन दावेदार ही अवस्था आहे, कल्याणच्या दुर्गाडी खाडी पूलाची. या पूलाचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. मात्र हे काम आमच्याचमुळे झाले, असा दावा शिवसेना, भाजप आणि मनसेने नेत्यांनी केल्याने कल्याण डोंबिवलीत श्रेयवादाची लढाई रंगली आहे. विशेष म्हणजे ही श्रेयवादाची लढाई आता आणखी तीव्र होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय (credit war over Durgadi new creek bridge between Shivsena, BJP and MNS).

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पणाचा कार्यक्रम

कल्याणच्या दुर्गाडी खाडी पुलाच्या दोन लेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण होत आहे. लोकार्पणाचा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजता होणार आहे. या कार्यक्रमात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पदाधिकारी आणि शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. पण या पुलाच्या कामावरुन कल्याण डोंबिवलीतील राजकारण चांगलेच तापले आहे (credit war over Durgadi new creek bridge between Shivsena, BJP and MNS).

भाजपची भूमिका काय?

“पूलाचे काम आम्हीच केले”, अशी बॅनरबाजी भाजपने काल (30 मे) केली. या मुद्यावर कपील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पूलाच्या कामाला मंजूरी दिली होती. कंत्रटदाराच्या हलगर्जीपणामुळे हे काम रखडले. त्यांच्याच कारकिर्दीत हे काम पूर्ण झाले असते”, अशी बाजू कपिल पाटील यांनी मांडली आहे.

मनसेची भूमिका काय?

सहा पदरी पूल व्हावा यासाठी मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळे या पूलाचे काम मार्गी लागत आहे, असा मनसेचा दावा आहे. विशेष म्हणजे लोकार्पण आधीच मनसे कार्यकर्ते पूलाजवळ लोकार्पणसाठी पोहचले. मात्र बाजारपेठ पोलिसांनी या कार्यकर्त्यांना पिटाळून लावले. त्यानंतर मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर कार्यकर्त्यांसह तिथे पोहचले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात शब्दीक वाद  झाला. यावेळी माजी आमदार प्रकाश भोईर यांनी नव्या पुलाची पाहणी केली.

शिवसेनेची भूमिका काय?

या कामाच्या निमित्ताने पूलावर शिवसेने झेंडे लावले आहेत. बॅनरबाजी केली आहे. शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी कार्यक्रमस्थळी तळ ठोकला आहे. “पालकमंत्र्यांच्या पाठपुरव्यामुळे हे काम मार्गी लागले. तसेच कोणाला बोलवायचे हा आमचा विषय नाही. आम्हाला एमएमआरडीने निमंत्रण दिले आहे”, अशी प्रतिक्रिया विश्वनाथ भोईर यांनी दिली.

हेही वाचा : श्रेयवादावरुन पुन्ह चुरस, दुर्गाडी खाडी पूलाच्या नव्या दोन लेनच्या लोकार्पणाच्या आधीच भाजपची बॅनरबाजी

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.