AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ताबरोबर थिरकले; ठाकरे गटाच्या नेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?

माझे त्याच्याशी संबंध कधीच नव्हते. मी सेंट्रल जेलमध्ये होतो, तेव्हा तो तिथे होता. सार्वजनिक जीवनात कुठे भेट झाली माहीत नाही. मॉर्फिंगही केली असेल. पोलिसांना आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत. तो तुरुंगाच्या बाहेर कशासाठी आला? पॅरोलवर आला की आत भेट झाली हे स्पष्ट होईल, असं ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी सांगितलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ताबरोबर थिरकले; ठाकरे गटाच्या नेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
sudhakar badgujarImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Dec 15, 2023 | 4:34 PM

चंदन पूजाधिकारी, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, नाशिक | 15 डिसेंबर 2023 : बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्या पार्टीत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आमदार नितेश राणे यांनी हे प्रकरण विधासनभेत लावून धरून या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी केली आहे. थेट दहशतवाद्याशीच संबंध असल्याचा आरोप झाल्याने सुधाकर बडगुजर यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सार्वजनिक जीवनात वावरत असताना सलीम कुत्ताशी कुठे तरी भेट झाली आहे. मला ते आठवत नाही. किंवा जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो मॉर्फिंग केलेला असेल, असं सांगतानाच पालकमंत्र्यांवरच देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी सुधाकर बडगुजर यांनी केली आहे.

सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर आपली बाजू मांडली. पालकमंत्र्यांनी माहिती न घेता सभागृहात आरोप केले आहेत. माहिती घेतली असती तर त्यांनी हे आरोप केले नसते. 2016मध्ये वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी सभा झाली होती. त्याला आम्ही विरोध केला होता. शिवसैनिकांनी आंदोलन केलं होतं. तेव्हा आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. माझ्यावरही गुन्हे होते. मी 15 दिवस तुरुंगात होतो. माझ्यासोबत अनेक लोक तुरुंगात होते. त्यावेळी तुरुंगात बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत हे मला माहीत नव्हतं, असं सांगतानाच मी राजकारणात येण्यापूर्वीपासून माझ्यावर साधी एनसीही नव्हती. ज्या काही केसेस आहेत, त्या राजकीय हेतूने दाखल झालेल्या आहेत, असं सुधाकर बडगुजर म्हणाले.

व्हिडीओ मॉर्फिंग केला असावा

माझं सलीम कुत्ताशी नाव जोडलं गेलं. त्याला 93-93 ला अटक झाली. मला 2016 मध्ये अटक झाली. त्यामुळे त्याच्याशी संबंध येण्याचा प्रश्नच येत नाही. व्हिडीओच्या माध्यमातून बेबनाव करण्यात आला आहे. तो व्हिडीओ मॉर्फिंग केला असावा. ते चुकीचं आहे. त्याचा नीट अभ्यास करा. गुन्हेगार तुरुंगात असेल तर तो बाहेर आला कसा? याची चौकशी व्हावी. तो पॅरोलवर आल्यावर सार्वजनिक जीवनात वावरू शकतो. अशावेळी त्याच्याशी भेट झाली असेल किंवा सार्वजनिक कार्यक्रमात भेटलो असेल तर माहीत नाही, असं बडगुजर म्हणाले.

आमचा तर करार नाही

राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरू असतात. हा बुद्धिबळाचा खेळ असतो. त्यावेळी आम्ही गुन्हे दाखल केले असतील आता त्यांनी आमच्यावर आरोप केले असतील. पण आम्ही पोलिसांना सहकार्य करू. या प्रकरणावर मी सुषमा अंधारे यांच्याशी चर्चा केली आहे. मी त्यांना सर्व माहिती दिली आहे. त्या मीडियात बोलणार आहेत, असं सांगतानाच दाऊदच्या घरी लग्न झालं, त्याला अनेक लोक गेले. पोलीसही गेले. प्रफुल्ल पटेल आणि इक्बाल मिर्ची यांचा करार आहे. ज्वॉइंट व्हेंचर आहे. त्याचं काय झालं? आमचा तर करार नाही, असा टोला त्यांनी लगावला.

त्यांच्या माथ्यावर कलंक

पालकमंत्री दादा भुसे यांनी सुधाकर बडगुजर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. पालकमंत्र्यावरच देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. एमडी ड्रग्स प्रकरणात तेच आहेत. एमडी ड्रग्स प्रकरणातील आरोप त्यांच्या जिव्हारी लागले. आम्ही त्यांच्या विरोधात मोर्चा काढला ते जिव्हारी लागलं. कलंक त्यांच्या माथ्यावर आहे. तो पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते इरिगेशनला जेई म्हणून होते. तिथे निलंबित झाले. त्याचं त्यांनीच आत्मपरीक्षण करावं, असा टोला त्यांनी लगावला.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.