Baramati Loksabha Voting : बारामतीमध्ये काय चाललंय? राडा, आमदाराची शिवीगाळ, सुप्रिया सुळे भरणेंच्या गावात
Baramati Loksabha Voting : . आमदार दत्ता भरणे यांनी ज्या कार्यकर्त्याला शिवीगाळ केली, त्याला सुप्रिया सुळेंना भेटल्यानंतर अश्रू अनावर झाले. त्याने आपली कैफीयत सुप्रिया सुळेंसमोर मांडली. हे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दुपार होता, होता बारामतीमध्ये राजकीय वातावरण प्रचंड तापलं आहे.
बारामतीमध्ये लोकसभेची निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची बनली आहे. पवार विरुद्ध पवार सामना आहे. महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार उमेदवार आहेत. बारामतीमध्ये काल रात्री मोठ्या प्रमाणात पैसा वाटण्यात आला, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. त्यांनी ते व्हिडिओ सुद्धा त्यांच्या X हँडलवर टाकले. हे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दुपार होता, होता बारामतीमध्ये राजकीय वातावरण प्रचंड तापलं आहे. शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवार गटावर पैसे वाटपाचे अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांनी काहीजणांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ रोहित पवार यांनी पोस्ट केलाय. सुप्रिया सुळे या तडक दत्ता भरणे यांच्या गावात गेल्या. ज्या कार्यकर्त्याला शिवीगाळ झाली, त्याची जाऊन भेट घेतली. पैसे वाटण्याचा प्रकार सुरु आहे. काय चाललय? तक्रार का दाखल करुन घेत नाही? असा सुप्रिया सुळेंनी प्रशासनाला सवाल केला. आमदार दत्ता भरणे यांनी ज्या कार्यकर्त्याला शिवीगाळ केली, त्याला सुप्रिया सुळेंना भेटल्यानंतर अश्रू अनावर झाले. त्याने आपली कैफीयत सुप्रिया सुळेंसमोर मांडली.
केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा… विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा… pic.twitter.com/5ECFw7EnCx
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 7, 2024
लीड मिळत नाहीय, म्हणून त्यांच संतुलन ढासळलं
आमदार दत्ता भरणे यांना त्यांच्या गावामध्ये लीड मिळत नाहीय. म्हणून त्यांच संतुलन ढासळलं आहे. इंदापूरची जनता सूज्ञ आहे असं सुप्रिया सुळेंसोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. काटेवाडीच्या माजी सरपंच यांचा विद्यमान सरपंच मंदाकिनी भिसे यांचा मुलगा सागर भिसे याला पैसे देतानाचे व्हिडिओ व्हायरल. पैसे देतानाचे सीसीटीव्ही फुटेज होतायत जोरदार सोशल मीडियावर व्हायरल. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर वायरल व्हिडिओ केला पोस्ट.