‘तालुक्यात विकास केल्यामुळं मला शांत झोप लागते’, भरणे मामांचा हर्षवर्धन पाटलांना टोला

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही हर्षवर्धन पाटलांना टोला लगावला आहे. इंदापूर तालुक्यात विकासकामं केल्यामुळे मला शांत झोप लागते, अशा शब्दात भरणेमामांनी हर्षवर्धन पाटलांना चिमटा काढलाय. भरणेंच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये मात्र चांगलाच हशा पिकला.

'तालुक्यात विकास केल्यामुळं मला शांत झोप लागते', भरणे मामांचा हर्षवर्धन पाटलांना टोला
दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 4:04 PM

पुणे : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. ‘भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून शांत झोप लागते, कुठली चौकशीही नाही’, असं वक्तव्य पाटील यांनी केलं होतं. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यानंतर आता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही हर्षवर्धन पाटलांना टोला लगावला आहे. इंदापूर तालुक्यात विकासकामं केल्यामुळे मला शांत झोप लागते, अशा शब्दात भरणेमामांनी हर्षवर्धन पाटलांना चिमटा काढलाय. भरणेंच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये मात्र चांगलाच हशा पिकला. ते इंदापुरातील का खासगी कार्यक्रमात बोलत होते. (Dattatraya Bharane criticizes BJP leader Harshvardhan Patil in Indapur )

हर्षवर्धन पाटलांचं नेमकं वक्तव्य काय?

हर्षवर्धन पाटील हे आपलं खुमासदार भाषण आणि मिश्किल वक्तव्यांमुळं चांगलेच चर्चेत असतात. मावळमध्ये बोलताना काँग्रेस सोडून भाजपमध्ये का आलो, याचं उत्तर त्यांनी दिलं. ‘स्टेज गमतीशीर आहे. आम्हाला भाजपमध्ये जावं लागलं. स्टेजवर एकानं बसल्या बसल्या विचारलं भाजपमध्ये का गेलात? तेव्हा मी त्याला म्हटलं, हे मला विचारण्यापेक्षा आपल्या नेत्याला विचारा की हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये का गेला? बाकी सध्या सगळं मस्त आहे, निवांत आहे, चांगली झोप लागते, चौकशी वगैरे नाही’, असं वक्तव्य पाटील यांनी केलं. पाटलांच्या या वक्तव्यानं स्टेजवर उपस्थित सर्वांच खळखळून हसले.

मावळमधील या कार्यक्रमाला भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री बाळा भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

पाटील म्हणतात विपर्यास केला!

दरम्यान, पाटील यांनी आता आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करुन वेगळे अर्थ काढले जात आहेत. मी भाषणात कुणाचाही उल्लेख केला नाही. कुणाचा उल्लेख करणं गरजेचं असल्याचं मला वाटत नाही. त्यामुळे वाक्याचा अनर्थ कुणी काढू नये. मला विधानसभेला तिकीट नाकारण्यात आलं म्हणून मी भाजपमध्ये गेलो. हा माझा राजकीय निर्णय आहे. माझ्या कुठल्याही चौकशीचा व माझ्या भाजप प्रवेशाचा काही एक संबंध नाही. विधानसभेला मला तिकीट देण्याचा शब्द दिला होता. मात्र, तो पाळला गेला नाही. त्यामुळेच मी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

संजय राऊतांचा भाजपला टोला

पाटील यांच्या या वक्तव्याचा धागा पकडत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. हर्षवर्धन पाटील यांच्या या एका वक्तव्यामध्ये सर्व काही सामावलेलं आहे, असं संजय राऊत म्हणाले. राज्यात सध्या अनिल देशमुख, अनिल परब, भावना गवळी, अजित पवार यांच्या नेत्यांवर ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या धाडी पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर पाटलांच्या वक्तव्याचा धागा पकडत राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय.

इतर बातम्या :

तारीख पे तारीख ! सोनियाच अध्यक्ष रहाणार, नव्या काँग्रेस अध्यक्षासाठी नवी तारीख

‘बाळासाहेब असते तर सर्वात आधी यांनाच हाकलून दिलं असतं’, नितेश राणेंना उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

Dattatraya Bharane criticizes BJP leader Harshvardhan Patil in Indapur

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.