AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परवानगी दिली तर फोन टॅपिंग होतं, अजितदादा संतापले, रश्मी शुक्लांची चौकशी अटळ?

फोन टॅपिंग प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार संतापलेले पाहायला मिळाले. परवानगी दिली तर फोन टॅपिंग होतं, असं ते म्हणाले. (DCm Ajit Pawar on Phone tapping)

परवानगी दिली तर फोन टॅपिंग होतं, अजितदादा संतापले, रश्मी शुक्लांची चौकशी अटळ?
अजित पवार
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 1:29 PM

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCm Ajit Pawar) संतापलेले पाहायला मिळाले. परवानगी दिली तर फोन टॅपिंग होतं, असं ते म्हणाले. यावरुन त्यांनी रश्मी शुक्ला यांच्या चौकशीचे संकेत दिले. तसंच राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या भाजपला त्यांनी आमच्याकडे बहुमत आहे, अशी आठवण करुन दिली. मुंबईत ते माध्यमांशी बोलत होते. (DCm Ajit Pawar on Phone tapping, president Rule And officer transfer Racket And Anil Deshmukh Case)

फोन टॅपिंग प्रकरणावर अजितदादा काय म्हणाले…?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकासआघाडीच्या महत्त्वाच्या मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती अजितदादांनी दिली आहे.

मुख्य सचिवांचा अहवाल गेमचेंजर ठरणार?

रश्मी शुक्ला या राज्य गुप्त विभागाच्या तत्कालीन आयुक्त असताना, कोणतेही कायदेशीर अधिकार नसताना त्यांनी राज्यातील काही महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींचे, सनदी अधिकाऱ्यांचे; तसेच काही पत्रकारांचेही फोन टॅप केले होते काय, याचा माग आता सरकारकडून काढला जाणार आहे. हे संपूर्ण प्रकरण घडले तेव्हा सीताराम कुंटे हे गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत होते. त्यामुळे त्यांचा अहवाल महाविकासआघाडीसाठी गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.

राज्य सरकार नियमानुसार काम करतंय

विरोधकांनी कितीही आरडाओरड केली, आरोप केले तरी राज्य सरकार नियमानुसार काम करत आहे. विरोधकांच्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही, असं सांगत राज्यातली कायदा सुव्यवस्था अबाधित आहे, असं अजित पवार म्हणाले.

महाविकास आघाडीकडे पूर्ण बहुमत

विरोधक सातत्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करत आहे. पण मला त्यांना सांगायचंय की महाविकास आघाडीक़े पूर्ण बहुमत आहे. आमच्या मित्रपक्षाचे आमदार आमच्यासोबत आहे. साहजिकच महाविकास आघाडी पूर्णबहुमताने सत्तेत आहे, असं अजित पवार म्हणाले.

त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याच नाहीत

अधिकारी बदल्यांच्या रॅकेटवरुन विरोधी पक्ष आरोप करतो आहे. पण त्या बदल्या झाल्याचं नाहीत, असा दावा अजित पवार यांनी केला आहे. ज्या बदल्या रश्मी शुक्ला यांनी सांगितले त्या बदल्या झालेल्या नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये ज्याचं नाव येईल त्याची चौकशी केली जाईल, असं म्हणत रश्मी शुक्ला यांच्या चौकशीचे संकेत अजित पवार यांनी दिले.

लॉकडाऊनवर अनेकांची मतंमतांतर

राज्यात लॉकडाऊन करण्याविषयी मतमतांतर आहेत. परंतु नियम पाळणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. 45 वर्ष खालील यांना कोरोना लागण होताना दिसत आहे, माझ्या देवगिरी बंगला येथील ९ जण कोरोना पाॅझिटीव्ह आढळले. त्यामुळे नियम पाळणं महत्त्वाचं बनलं आहे, असं अजित पवार म्हणाले.

राज्य प्रमुख निर्णय घेतील, आम्ही सर्व त्यांच्यासोबत

अनिल देशमुख यांच्या चौकशीबाबत सीएम उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या मंत्री आणि नेत्यांशी चर्चा केली. विषय गंभीर आहे. राज्य प्रमुख निर्णय घेतील, आम्ही सर्व कॅबीनेट, नेते त्यांच्या सोबत आहोत, असंही अजित पवार म्हणाले.

शरद पवार यूपीए अध्यक्ष व्हावे का?, अजित पवार म्हणाले…

शरद पवार यूपीए अध्यक्ष व्हावे का यावर मी बोलणार नाही? कारण केंद्राच्या विषय यावर मी बोलणे योग्य नाही. राज्यातील विषयावर मी बोलतो. केंद्रीय विषयावर बोलणारे आमचे इतर नेते आहेच. याविषयावर सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल आणि स्वत: पवारसाहेब बोलतील, असं ते म्हणाले.

(DCm Ajit Pawar on Phone tapping, president Rule And officer transfer Racket And Anil Deshmukh Case)

हे ही वाचा :

शरद पवारांनी काँग्रेसचा ‘तो’ प्रस्ताव नाकारला; पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या मदतीला जाणार?

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.