दर्शन घेण्याएवढे बाळासाहेब थोर आहेत, मग त्यांच्याच संपत्तीची चौकशीची मागणी का केली? : दीपक केसरकर
"जर बाळासाहेब ठाकरे यांचं दर्शन घेण्याएवढे बाळासाहेब थोर आहेत, तर मग त्यांच्याच संपत्तीची चौकशी करण्याची मागणी यांनी केली होती. त्यामुळे त्यांनी नितीमत्तेच्या गोष्टी करू नये," असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं.
सिंधुदुर्ग : शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केलीय. “जर बाळासाहेब ठाकरे यांचं दर्शन घेण्याएवढे बाळासाहेब थोर आहेत, तर मग त्यांच्याच संपत्तीची चौकशी करण्याची मागणी यांनी केली होती. बाळासाहेब जीवंत असताना त्रास द्यायचा आणि ते गेल्यावर नाटकं करायची याला माझा विरोध आहे,” असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केलंय. ते पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलत होते.
दीपक केसरकर म्हणाले, “जर बाळासाहेब ठाकरे यांचं दर्शन घेण्याएवढे बाळासाहेब थोर आहेत, तर मग त्यांच्याच संपत्तीची चौकशी करण्याची मागणी यांनी केली होती. त्यामुळे त्यांनी नितीमत्तेच्या गोष्टी करू नये. नितीमत्ता काय असते हे मला माहिती आहे. बाळासाहेब जीवंत असताना त्यांना त्रास द्यायचा आणि ते गेल्यावर हे सगळे नाटकं करायची याला माझा विरोध आहे.”
“राणेंच्या मुलानं मला धमक्या दिल्या, त्याला मी अजिबात भीक घालत नाही”
“राणेंच्या मुलाने मला धमक्या दिल्या. या धमक्यांना मी अजिबात भीक घालत नाही. कारण मी महाराष्ट्राचा एकमेव आमदार आहे ज्याच्या प्रॉपर्टी कमी झाल्यात. राजकारणासाठी मी माझ्या प्रॉपर्टी विकतो, कर्ज घेतो, ते कर्ज फेडतो, पण माझी नैतिकता कधी ढासळली नाही. ही नैतिकता असल्यानंच मी लढे देऊ शकतो. माझा लढा कोकणाचा विकासासाठी आहे,” असंही केसरकर यांनी नमूद केलं.
“एका गरीब व्यक्तीला मरेपर्यंत मारलं, त्यानंतर त्या मोठ्या मंत्र्याचा बंगला पाडण्याचे आदेश”
दीपक केसरकर म्हणाले, “एका मोठ्या मंत्र्याचा बंगला पाडल्याचे आदेश दिल्याचं काही लोक म्हणतात. मात्र, एका गरीब व्यक्तीला या जिल्ह्यातील एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मरेपर्यंत मारलं. यानंतर तो व्यक्ती पेटून उठला. त्याने या नेत्याची सर्व प्रकरणं उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेली. त्यानंतर या मोठ्या मंत्र्याचा बंगला पाडण्याचे आदेश निघाले. गरीब माणूस काय करु शकतो हे अनेक लोकांना माहिती नसतं. मात्र, गरीब माणूस असलो म्हणून अशाप्रकारे मारला जाता कामा नये. ही महाराष्ट्राची भूमी आहे, इथं हे चालणार नाही.”
“एक सर्वसामान्य व्यक्ती हे करु शकतो मग राजकीय पक्ष हे का करु शकत नाही?”
“मारहाण झालेल्या व्यक्तीला फ्लॅट देण्याचं आश्वासन देण्यात आलं. लाखो रुपयांची आश्वासनं देण्यात आली. मात्र, त्याने आपला संघर्ष सोडला नाही. या संघर्षासाठी न्यायालयाची दारं नेहमी उघडी असतात. हे करताना तत्वांपासून मागे जायचं नसतं. तत्व सोडली तर रिझल्ट मिळणार नाही. एक सर्वसामान्य व्यक्ती हे करु शकतो मग राजकीय पक्ष हे का करु शकत नाही?” असा सवाल केसरकर यांनी विचारला.
“माझा राजकीय संघर्ष कधीही रक्तरंजित नव्हता. माझा संघर्ष मारामारीचा संघर्ष नव्हता. मी माझ्या मार्गाने गेलो, विरोधकांना मतपेटीतून हरवलं. मी जेव्हा माझी घोषणा केली तेव्हा मी शिवसेनेतही नव्हतो. मी राष्ट्रवादीत होतो आणि आमदार होतो. राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन त्या संघर्षात उतरलो,” असंही केसरकर यांनी सांगितलं.
हेही वाचा :
‘ज्यांना सिंधुदुर्गाचं नेतृत्व करता आलं नाही ते आता उद्धव ठाकरेंसारख्या संयमी नेतृत्वावर टीका करतायत’
उद्धव ठाकरे म्हणाले होते, कुठल्याही पक्षात जा, तुला निवडून आणण्याची जबाबदारी माझी : केसरकर
वेळ-काळ ठरवा, आम्ही नितेश राणेंना राजीनामा द्यायला लावतो, भाजपने शिवसेनेचे चॅलेंज स्वीकारले
व्हिडीओ पाहा :
Deepak Kesarkar criticize Narayan Rane over Balasaheb Thackeray respect