Eknath Shinde : दीपक केसरकर शिंदे गटात सामील, गुवाहाटीमध्ये दाखल, अख्खी शिवसेना शिंदेंच्या बाजूने?

दीपक केसरकर शिंदे गटात सामील झाल्याची माहिती आहे.

Eknath Shinde : दीपक केसरकर शिंदे गटात सामील, गुवाहाटीमध्ये दाखल, अख्खी शिवसेना शिंदेंच्या बाजूने?
दीपक केसरकर
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 9:25 AM

मुंबई : शिवसेना नेते दीपक केसरकर हे एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याची माहिती आहे. गुवाहाटीमध्ये केसरकर दाखल झाले आहेत. अख्खी शिवसेना शिंदेंच्या बाजूने, असल्याचंही आता बोललं जातंय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांच्या 37 पेक्षा जास्त आमदार असल्याचं बोललं जातंय. आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र ते राज्यपालांना देणार असल्याची शक्यता आहे. एक एक करून अनेक आमदार शिंदे गटात गेले आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील सहा मंत्री देखील शिंदे गटाला मिळाले आहेत. यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता दोन तृतीआंश शिवसेना (Shiv Sena) आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे आता पक्षांतर बंदी कायद्याचा कोणताही परिणाम शिंदे यांच्यावर होणार नाही, हेही स्पष्ट आहे.

आमदारांची जमवाजमव, गणित जाणून घ्या…

  1. महाराष्ट्रातील जवळपास 5 आमदार नॉटरिचेबल
  2. 3 आमदार गुवाहाटीला पोहचून शिंदे गटात
  3. हे सुद्धा वाचा
  4. 46 आमदार आमच्यासोबत असल्याचा शिंदेंचा दावा
  5. उपसभापती झिरवळांना दिलेल्या पत्रात 34 आमदा्रांच्या स्वाक्षऱ्या
  6. 37 आमदारांची एकनाथ शिंदेंकडून जमवाजमव
  7. दीपक केसरकर शिंदे गटात सामील झाल्यानं संख्या वाढली
  8. आमदार नितीन देशमुख शिंदे गटातून बाहेर

एकनाथ शिंदे गटाचं संख्याबळ वाढत असून शिवसेनेचे आणखी पाच आमदार नॅटरिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे हे पाच आमदार शिंदे गटात तर दाखल होणार नाहीत ना, असाही प्रश्न निर्माण होतेय.

महाराष्ट्रातील नॉटरिचेबल आमदार

  1. दादा भुसे
  2. संजय राठोड
  3. सदा सरवणकर
  4. मंगेश कुडाळकर
  5. दिलीप लांडे

एकनाथ शिंदे गटाने 37 आमदारांची मॅजिक आकडा गाठळ्यास पक्षांतरबंदी कायदा शिंदे गटाला लागू होणार नाही. हा कायदा नेमका काय आहे. जाणून घ्या…

काय आहे पक्षांतरबंदी कायदा

राजकीय पक्षांतील आयाराम-गयाराम संस्कृतीला चाप लावण्यासाठी 1985 साली तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सरकारने 52 वी घटनादुरुस्ती करत, 10 व्या परिशिष्ठाचा समावेश केला. त्यानुसार कलम 102 आणि 191 या आमदार-खासदारांना अपात्र ठरवू शकणाऱ्या अनुच्छेदांमध्ये बदल करण्यात आला. या तरतुदींना पक्षांतर बंदी कायदा म्हणून ओळखले जाऊ लागले.

तज्ज्ञ काय म्हणतात?

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी म्हटलंय, की 37 आमदार जर एकनाथ शिंदे यांच्याकडे असतील, तर आता याची पुढील प्रक्रिया विधीमंडळात होईल. सरकारला मुख्यमंत्र्यांना विश्वासमत प्रक्रिया करावी लागेल. विश्वासमत दर्शक जर प्रस्ताव आणायचा असेल, तर अधिवेशन बोलवावं लागले. त्यानंतरच अविश्वास ठराव होऊ शकतं. तोपर्यंत आता असलेले आमदार एकनाथ शिंदेसोबत राहतील का, असाही प्रश्न उपस्थित होतो. सरकार तर अल्पमतात येईलच, पण शिवसेनेच्या अंतर्गत अडचणी आणखी वाढतील, असंही त्यांनी म्हटलंय.

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.