राहुल गांधींना मिठी मारणाऱ्यांना आदित्य ठाकरेंचं आधी शुद्धीकरण करा- केसरकर
दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केलीय...
मुंबई : काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या सुरु आहे. ही यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. यात महाविकास आघाडीचे नेते सहभागी होत आहे. आदित्य ठाकरेदेखील भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. तिथे त्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची गळाभेट घेतली यावर शिंदेगटाकडून शाब्दिक हल्ला चढवण्यात आला आहे. भारत जोडो यात्रेत सहभागी होणाऱ्या, राहुल गांधींना मिठी मारणाऱ्या आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना आधी अंघोळ घाला. त्यांचं शुद्धीकरण करा, असं शिंदेगटाचे नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणालेत.
बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन आहे. दसरा मेळाव्यावरून मोठा वाद झाला. त्यानंतर आता शिंदे-ठाकरे संघर्ष टाळण्यासाठी शिंदेगटाच्या वतीने एकदिवस आधी म्हणजे काल बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर शिवसेनेच्या ठाकरेगटाच्या वतीने बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी गोमूत्र शिंपडत शुद्धीकरण करण्यात आलं. त्यावर दीपक केसरकर यांनी ठाकरेगटाला प्रत्युत्तर दिलंय.
बाळासाहेब हिंदुत्ववादी विचारांचे होते. त्यांच्या विचारांना डावलत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. हे बाळासाहेबांना कदापि मान्य झालं नसतं. त्यामुळे त्यांना बाळासाहेबांचे आशीर्वाद मिळतील की नाही, याबाबत मला शंका वाटते, असं केसरकर म्हणालेत.
शीतल म्हात्रे यांची आदित्य ठाकरेंवर टीका
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना राहुल गांधी मिठी मारतात. त्यामुळे आदित्य ठाकरेंचंही शुद्धीकरण करावं लागेल. फक्त गोमूत्र शिंपडून चालणार नाही. तर त्यांना गोमुत्राने अंघोळच घालावी लागेल. तेव्हा आदित्य यांचं शुद्धीकरण होईल, असं शिंदेगटाच्या नेत्या शीतल म्हात्रे म्हणाल्या आहेत.