Eknath Shinde : गुवाहाटीमधून निघण्याची शक्यता! दीपक केसरकर यांनी दिली मोठी बातमी

Shivsena : गुवाहाटीमधून निघण्याची शक्यता! दीपक केसरकर यांची माहिती

Eknath Shinde : गुवाहाटीमधून निघण्याची शक्यता! दीपक केसरकर यांनी दिली मोठी बातमी
एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 8:53 AM

मुंबई : शिंदे गटातील आमदारांनी मुंबईत यावं, अशी गळ उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनीही घातली. त्याच संदर्भातली एक महत्वाची बातमी आहे. गुवाहाटीतून आमदार निघण्याची शक्यता आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) दिली आहे. “गुवाहाटीतून आम्ही निघण्याची शक्यता आहे. आता अविश्वास ठराव लगेच होण्याची शक्यता आहे. फ्लोअर टेस्टला कोर्टानं विरोध केलेला नाही. नुसत्या अपक्षांनी मतदान केलं ना, तरी हे सरकार पडणार. 39 लोकांची वेडी आशा का ठेवता. तुम्ही वाट्टेल तसं या लोकांना बोलणार आणि त्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा करणार. दावे खोटे आहेत, एवढ्या मोठ्या लोकांबद्दल काय बोलायचं. मोठी लोकं असं बोलायला लागली, तर काय बोलायचं”, असं केसरकर म्हणालेत. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

“आम्ही एकत्र असल्यामुळे आम्ही आनंदता आहोत. आसाममध्ये पूर असलेल्या भागात आम्ही नाही. कुणीही मंत्री आपलं काम सोडून इथं आलेलं नाही. मुख्यमंत्री निधीला शिंदे यांनी 50 लाखाचा चेक दिलाय. त्याच्याच बरोबर मुंबईतील कुर्ल्यात जे झालं, त्यातही मृतांच्या नातलगांनाही मदत जाहीर केलीये. ती रक्कमही त्या त्या कुटुंबाना लगेच पोहोचेल”, असंही केसरकर म्हणालेत.

“अविश्वास ठरावासाठी 100 टक्के बंडखोर आमदार तयार आहेत. उगाच धमक्या देऊ नये. लोकशाहीला तुम्ही पुरक नाही, असा अर्थ त्यातून निघतो. कालही सांगत होतो की उद्धव ठाकरेंनी पुढाकार घ्यावा आणि भाजपसोबत बोलणी करावीत. पण आता या सगळ्याच्या पुढे गेलेलं आहे. आमदारांच्या सगळ्या भावना आम्ही मांडल्या. 50 आमदारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. फूट पाडायची होती, तर आम्ही फोन कशाला आपल्याकडे ठेवला असता. चर्चेची दारं बंद झाली आहेत. कालही आम्ही सांगितलं होतं. मविआसोबतचं नातं तुम्ही तोडत नाही. आमची मुख्य मागणी तुम्ही मान्य करत नाही. मग आम्ही बोलायचं काय? उद्धव ठाकरेंनी पवारांपेक्षा आपल्या कार्यकर्त्यांवर कमी प्रेम. त्यांनी कार्यकर्त्यांना थोडी जास्त आत्मीयता दाखवली असती, तर फार बरं झालं असतं”, असंही केसरकरांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.

हे सुद्धा वाचा

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.