श्रीकांत शिंदेंच्या जागेवर भाजपाचा दावा, दीपक केसरकर म्हणतात… दावा करणं वेगळं आणि…

शिवाजी पार्कमध्ये होणारा दसरा मेळावा यंदा शिवसेनेचा होणार की शिंदेसेनेचा, या प्रश्नावरून वादंग सुरु आहे. दीपक केसरकर म्हणाले, दसरा मेळाव्याची घोषणा मुख्यमंत्री करतील.

श्रीकांत शिंदेंच्या जागेवर भाजपाचा दावा, दीपक केसरकर म्हणतात... दावा करणं वेगळं आणि...
दीपक केसरकर, शिक्षणमंत्री Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 1:05 PM

मुंबईः मिशन 2024 साठी भाजपने कंबर कसली आहे. महाराष्ट्रातील 16 लोकसभा (Loksabha) मतदार संघांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. या यादीत कल्याण लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहेत. सध्या इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे खासदार आहेत. भाजपने या जागेसाठीही मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यामुळे राजकीय (Maharashtra politics) वर्तुळाच्या भुवया ताणल्या गेल्यात. एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यावर संयत प्रतिक्रिया दिलीय. कुणी कुठं दावा सांगावा, हे प्रत्येकाच्या मनावर असतं. पण दावा करणं म्हणजे निवडून येणं नाही.

शिवसेना-भाजप युती अभेद्य

श्रीकांत शिंदेंच्या जागेवर भाजपाच्या दाव्यावर दीपक केसरकर यांनी सावध भूमिका मांडली. ते म्हणाले, कुणीही दावा केला तरी निवडून येणं होत नाही. यामुळे शिवसेना-भाजप युतीवर परिणाम होणार नाही. ही युती अभेद्य आहे. त्यानंतर मिशन 151 कुणी काढलं? हे सर्वांना माहिती आहे.

जनतेला दुखवायचं. त्यांच्यासमोर हिंदुत्व म्हणून जायचं आणि नंतर सत्तेसाठी निष्ठा बदलायची. महाराष्ट्राच्या दृष्टीने हे कदापि सहन होणार नाही. त्यामुळे आम्ही लोकांसाठी काम करतोय. यात राजकारण करणार नाही.

सुनावणीवर काय म्हणाले?

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाची सुनावणी येत्या 27 सप्टेंबर रोजी होणार आहे. आज यावर घटनापीठासमोर सुनावणी झाली. दीपक केसरकर म्हणाले, राज्याला जे सरकार मिळालयं, त्यांच्याकडून चांगलं काम व्हावं, अशीच गणपती बाप्पाकडे मागणी आहे.

न्यायालय निकाल देत असतं. आजच्या सुनावणीत निकाल लागला नाही. पण या प्रक्रियेवर भाष्य करणे योग्य नाही. मीडिया ट्रायल घेऊ नये, असंही म्हटलं जातंय. पण आम्ही न्यायालयाच्या प्रक्रियेवर बोलायचं नाही, असं ठरवलंय.

दसरा मेळाव्याचं काय होणार?

शिवाजी पार्कमध्ये होणारा दसरा मेळावा यंदा शिवसेनेचा होणार की शिंदेसेनेचा, या प्रश्नावरून वादंग सुरु आहे. दीपक केसरकर म्हणाले, दसरा मेळाव्याची घोषणा मुख्यमंत्री करतील. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी एकनिष्ठ आहेत. त्यांच्या विचारासाठीच शिंदेंनी लढा दिलाय. त्यामुळे दसऱ्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. परंतु याबाबत काय करायचं, याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. यात राजकारण केलं जाणार नाही…

श्रीकांत शिंदेंच्या जागेवर भाजपाचा दावा

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.