दिल्ली विधानसभा निवडणूक : अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात भाजपचा उमेदवार कोण?
भाजपने अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात (Arvind Kejriwal vs Sunil Yadav) भारतीय जनता युवा मोर्चा दिल्लीचे अध्यक्ष सुनील यादव यांना तिकीट दिलं आहे.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीचं रण तापू लागलं आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal vs Sunil Yadav) यांच्या आम आदमी पक्षाने सर्व 70 उमेदवार एकाचवेळी जाहीर केले. त्यानंतर आता भाजपनेही दुसरी यादी जाहीर करुन 10 उमेदवारांची घोषणा केली. या उमेदवार यादीत भाजपने अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात (Arvind Kejriwal vs Sunil Yadav) भारतीय जनता युवा मोर्चा दिल्लीचे अध्यक्ष सुनील यादव यांना तिकीट दिलं आहे. भाजपने 57 उमेदवारांची पहिली यादी यापूर्वी जाहीर केली होती.
दरम्यान, नवी दिल्ली या मतदारसंघात आता अरविंद केजरीवाल विरुद्ध भाजपचे सुनील यादव अशी लढत होणार आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, केजरीवालांसमोर यादव यांचं आव्हान हे दुबळं आहे. सुनील यादव यांच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, ते व्यवसायाने वकील आहेत. शिवाय त्यांना समाजकार्याची आवड आहे. त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात युवा मोर्चा मंडल अध्यक्ष म्हणून केली.
भाजपने या दहा जणांच्या यादीत दिल्ली भाजपचे फायरब्रँड नेते म्हणून ओळख असलेले तजिंदर पालसिंह बग्गा यांनाही उमेदवारी दिली. बग्गा यांना हरिनगर विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरवलं आहे. त्यांची लढत आपच्या राजकुमारी ढिल्लन यांच्याशी होणार आहे. याच मतदारसंघात काँग्रेसचे सुरेंद्र सेठी मैदानात आहेत.
भाजपने 17 जानेवारीला पहिली 57 जणांची उमेदवार यादी जाहीर केली होती. यामध्ये 20 नव्या चेहऱ्यांचा समावेश होता. यामध्ये चार महिला आणि 11 अनुसूचित जाती समुदायातील उमेदवारांचा समावेश होता.
दिल्ली विधानसभा निवडणूक
राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. (Delhi Assembly Election 2020 Dates) 8 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे, तर 11 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. पुढील महिन्यात दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. दिल्लीत एकाच टप्प्यात सर्व 70 जागांसाठी मतदान होणार आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूक
- अधिसूचना – 14 जानेवारी
- छाननी – 22 जानेवारी
- अर्ज मागे घेण्याची तारीख – 24 जानेवारी
- मतदानाची तारीख – 8 फेब्रुवारी 2020
- मतमोजणीची तारीख – 11 फेब्रुवारी 2020
पक्षीय बलाबल 2015
- आप – 67
- भाजप – 03
- काँग्रेस -00
- एकूण – 70
संबंधित बातम्या