Ajit Pawar: तो घरचा मामला होता गं बाई, अजित पवारांनी राज ठाकरेंचं बंड नाकारलं
भुजबळ राणे यांचं बंड. त्यात तिसरं आपल्या काळात घडलेलं शिंदेंचं बंड. हे पाहिलं तर बंड करणारी व्यक्ती एकवेळ टिकते पण बाकीचे सहकारी नंतर निवडून पण येऊ शकत, एवढे शिवसैनिक कष्ट करतात. त्यांना पराभूत करण्यासाठी जीवाचं रान करतात असा आजपर्यंतचा अनुभव आहे, असे अजित दादा पुढे म्हणाले.
मुंबई : राज्यात सुरु असलेल्या राजकीय संघर्षाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी शिवसेनेतील बंडांबाबत प्रश्न विचारताना अजितदादांकडे राज ठाकरे (Raj Thackarey) यांचे नाव घेतले असता अजित दादांनी ‘तो घरचा मामला होता गं बाई’ असं म्हणत राज ठाकरेंचे बंड (Revolt) नाकारलं. शिवसेनेत ज्या ज्या वेळी बंड झालं, त्यावेळी नेते एकटे एकटे बाजूला गेले. त्यावेळी शिवसैनिक त्यांच्यासोबत गेले नाहीत, शिवसैनिक शिवसेनेसोबत राहिले. भुजबळ राणे यांचं बंड. त्यात तिसरं आपल्या काळात घडलेलं शिंदेंचं बंड. हे पाहिलं तर बंड करणारी व्यक्ती एकवेळ टिकते पण बाकीचे सहकारी नंतर निवडून पण येऊ शकत, एवढे शिवसैनिक कष्ट करतात. त्यांना पराभूत करण्यासाठी जीवाचं रान करतात असा आजपर्यंतचा अनुभव आहे, असे अजित दादा पुढे म्हणाले.
भांड्याला भांडं लागतं, त्यातून टोकाला कुणी जाऊ नये
पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव येत होतं. ते पॉप्युलर होते. कोरोना काळात त्यांनी चांगलं काम केलं. आताच्या घडीला नेता कोणताही मोठा नेता तिथं येऊन काही करतो हे दिसत नाही. भांड्याला भांडं लागतं त्यातून आवाज येतो. त्यातून टोकाला कुणी जाऊ नयेत. तिथे जाणारे लोकं किती स्वखुशीने गेले ? किती बळजबरीने गेले ? हा संशोधनाचा भाग आहे. दोन आमदार आले. ते म्हणतात, अजून काही लोक यायचे बाकी आहेत. काल वर्षावरून मातोश्रीवरून मुख्यमंत्री जात असताना शिवसैनिकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे, असे अजित दादा म्हणाले.
आम्ही पाठिंबा काढणार नाही
आम्ही पाठिंबा काढणार नाही. आम्ही आघाडीला पाठिंबा दिला. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाला पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांच्यासोबत कायम राहणार. नाना पटोले यांनी काय विधान करावं हा त्यांचा अधिकार आहे. मला त्याचं काय घेणं देणं. आम्ही त्यांच्याबरोबर सरकारमध्ये आहोत. आम्ही आताच्या घडीला त्यांच्याबरोबर सत्तेत आहोत. आज सर्व नेते आणि पदाधीकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीला सगळे आमदार, खासदार उपस्थित होते. राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली, त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे शिवसेना आणि उध्दव ठाकरे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत. आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि आम्ही सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊ आहोत, असे अजित दादांनी स्पष्ट केले. (Deputy Chief Minister Ajit Pawar declined to comment on Raj Thackeray)