Devendra Fadanvis | हा मर्द मराठा, छत्रपतींचा मावळा बाहेर पडला आणि…. देवेंद्र फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक!

महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर अनेक भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता होती. मात्र ते माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे होते, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

Devendra Fadanvis | हा मर्द मराठा, छत्रपतींचा मावळा बाहेर पडला आणि.... देवेंद्र फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक!
Image Credit source:
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 5:49 PM

मुंबईः एकनाथ शिंदेंसारखा मर्द मराठा, छत्रपतींचा मावळा बाहेर पडला आणि महाविकास आघाडीसारख्या (Mahavikas Aghadi) सुस्त सरकारला हादरा बसला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बाहेर पडले तेव्हा आपलं सरकार येईलच हे माहिती नव्हतं. पण असं घडलं नसतं तर एकनाथ सिंदे यांचं सामाजिक, राजकीय जीवन समाप्त करण्यात आलं असतं. शिंदेंनी कशाचीही पर्वा न करता, फक्त बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) कार्यकर्ता राहण्याचं ठरवलं, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं. पनवेल येथील भाजप कार्यकारिणीच्या समारोप सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर तुफ्फान फटकेबाजी केली.

एकनाथ शिंदेंचं कौतुक…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ या महाराष्ट्रात आश्चर्य घडलंय. सत्तेत एक ताकद असतं, लोहचुंबक असतं. राज्यात पहिल्यांदा 50 आमदारांनी, त्यात 9 मंत्री यांनी सरकार सोडून विरोधकांसोबत येण्याचा निर्णय केला. ज्या प्रकारे वागणूक मिळत होती, सरकार सुरु होतं. त्यांना माहित होतं की सरकार असचं चालवलं तर पुढच्या निवडणुकीत दिसणार नाही. मनापासून अभिनंद करीन एकनाथ शिंदे यांचं. एक मर्द मराठा, छत्रपतींचा मावळा बाहेर पडला. ते बाहेर पडले तेव्हा ठरलं नव्हतं की सरकार येईलच. असं घडलं नसतं तर त्यांचं सामाजिक, राजकीय जीवन समाप्त करण्यात आली असती, पण त्यांनी त्याचा विचार केला नाही. त्यांनी ठरवलं, बाळासाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता आहे. त्यांच्या विचारांशी जर फारकत घेतली जात असेल, ज्यांच्याशी लढा केला त्यांच्या अधिपत्याखाली काम करावं लागत असेल. ज्यांनी बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासोबत जावं लागत असेल. सावरकरांचा अपमान रोज सहन करायचा. दाऊदशी संबंधित मंत्री जेलमध्ये जातो, त्याच्याविरोधात बोलता येत नाही. बाळासाहेबांचा शिवसैनिक हे सहन करु शकत नव्हता. हे परिवर्तन सत्तेसाठी नाही विचारांसाठी आहे. राज्यासाठी हे आवश्यक होतं म्हणून ते केलं…

‘भाजप नेते माझ्या पाठिशी खंबीर उभे’

महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर अनेक भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता होती. मात्र ते माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे होते. हे सांगताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ भाजप नेते भक्कमपणे राहिले. सगळ्यांनी मिळवून मला विरोधी पक्षनेता बनवल्यानंतर दोन्ही सभागृहातले आमदार माझ्या पाठिशी उभे राहिले. अस्वस्थता असायची, पण सगळे माझ्या बाजूने आहेत. कुणीही माझ्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभं केलं नाही. सेनापतीच्या मागे सगळे भक्कम उभे राहिले, तेव्हा लढाई जिंकता येते. तिकडे जे स्वतःहून सेनापती झाले होते, त्यांचे मावले कधी गेले कळलं नाही.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.