VIDEO | निलेश लंके फाऊंडेशनसाठी कार्यकर्त्याचा चेक, लंकेंना फोन करुन अजित पवार म्हणतात…

निलेश लंके यांना हा चेक कसा पोहोचेल, त्यांचे कोणी कार्यकर्ते पुण्यात असतील तर त्यांना निरोप देण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या (Ajit Pawar calls Nilesh Lanke)

VIDEO | निलेश लंके फाऊंडेशनसाठी कार्यकर्त्याचा चेक, लंकेंना फोन करुन अजित पवार म्हणतात...
Ajit Pawar calls Nilesh Lanke
Follow us
| Updated on: May 14, 2021 | 12:34 PM

पुणे : पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सकाळीच विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले. यावेळी एका दिव्यांग कार्यकर्त्याने अजित पवारांच्या हातात एक चेक ठेवला. चेकवरील नाव वाचून अजितदादांनी लागलीच राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांना फोन केला आणि तुझं काम चांगलं चालू आहे, असं म्हणत शुभेच्छा दिल्या. (Deputy CM Ajit Pawar calls NCP MLA Nilesh Lanke to give wishes for COVID related work)

पुण्यातील कोरोना विशेष बैठकीत आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी साडेआठ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले. त्यापूर्वी अजित पवार यांनी राज्यातील जनतेला अक्षय्य तृतीया आणि रमझान ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ॲम्बुलन्स आणि इतर वैद्यकीय साहित्याचे त्यांनी लोकार्पण केले.

अजित पवारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

यावेळी अनेक सामाजिक संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्यासाठी अजित पवार यांच्याकडे चेक सुपूर्द केले. या चेकची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे देऊन अजित पवार यांनी संबंधितांना पावती आणि आभार मानणारे पत्र देण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर एक दिव्यांग कार्यकर्ता पुढे आला आणि त्याने अजित पवारांच्या हातांमध्ये एक चेक ठेवला.

चेक लंकेंपर्यंत पोहोचवण्यासाठी सूचना

चेकवर नाव होतं निलेश लंके फाउंडेशन, तर मदत होती 2100 रुपयांची. ही बाब लक्षात आल्यानंतर निलेश लंके यांना हा चेक कसा पोहोचेल, त्यांचे कोणी कार्यकर्ते पुण्यात असतील तर त्यांना निरोप देण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या. या सूचना देताना अत्यंत बारकाईने चेकवरचे नाव, दिनांक या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत का, हे तपासून घेण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी दिल्या. निलेश लंके हे अहमदनगरमधील पारनेर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. (Ajit Pawar calls Nilesh Lanke)

अजितदादांचा निलेश लंकेंना फोन

दरम्यान अजित पवारांच्या स्वीय सहायकांनी थेट निलेश लंके यांना फोन लावून दिला. अजित पवार यांनी निलेश लंके यांच्याशी बोलायला सुरुवात केली. “तुझे कोव्हिड सेंटरचे काम टीव्हीवर बघून अनेक जण मदत करत आहेत. तुझं काम चांगलं चालू आहे. तुझं काम बघून आमच्या काही कार्यकर्त्यांनाही तुला मदत करायची आहे. एकवीसशे रुपयांचा चेक दिलाय, तो तुझ्याकडे पाठवतोय, असंच काम सुरु ठेवा” अश्या सूचनाही अजित पवार यांनी केल्या.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

रुग्णांना मदत करण्यात अपयश आलं, तर रात्र रात्र झोप येत नाही : आमदार निलेश लंके

बालपणी बाळासाहेब ठाकरेंनी डोक्यावर हात ठेवला, आता पवारांचे आशीर्वाद; आमदार लंकेंची चर्चा तर होणारच!

(Ajit Pawar calls Nilesh Lanke)

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.