Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जे झालं, तेच ‘या’ 5 जणांसोबत झालं! नारायण राणेही त्यापैकीच एक

Deputy CM of Maharashtra Devendra Fadnavis : 1975,1985,1999, 2008 आणि 2014 मध्ये मुख्यमंत्रीपदी काम केलेल्या दिग्गजांना नंतर मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करण्याची वेळ आली होती.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जे झालं, तेच 'या' 5 जणांसोबत झालं! नारायण राणेही त्यापैकीच एक
देवेंद्र फडणवीस, नारायण राणे...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 7:42 AM

मुंबई : 2014 ते 2019 असं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद (CM of Maharashtra), त्यानंतर पुन्हा 80 तास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मग 2019 ते 2022 विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम केलेल्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis News) यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्रीपदाची (Deputy CM Devendra Fadnavis) शपथ घेतली. सुरुवातीला आपण मंत्रिमंडळात नसणार असं सांगितलं. त्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या. अखेर एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात काम करणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या नेत्यांना पुन्हा मंत्रिपदी काम करावं लागलेल्याची, ही काही पहिलीच घटना नाही. याआधीही असं अनेकदा घडलं आहे. यात खुद्द नारायण राणे यांचाही समावेश आहे. 1975,1985,1999, 2008 आणि 2014 मध्ये मुख्यमंत्रीपदी काम केलेल्या दिग्गजांना नंतर मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करण्याची वेळ आली होती. जाणून घेऊयात, कोण आहेत ते पाच जण..

कोण आहेत ते पाच नेते?

  1. शंकरराव चव्हाण : 1975 मध्ये शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री होती. मुख्यमंत्री पदावर काम केल्यानंतर 1978 मध्ये शरद पवार यांच्या पुलोद सरकारमध्ये त्यांनी अर्थमंत्री म्हणून नंतर काम केलं होतं.
  2. शिवाजीराव पाटील निलंगेकर : 1985 मध्ये शिवाजीराव पाटील-निलंगेकर हे मुख्यमंत्री होते. पण 2004 साली जेव्हा सुशीलकुमार शिंदे सरकार आलं, ते शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना शिंदे मंत्रिमंडळात महसूलमंत्री करण्यात आलं होतं.
  3. नारायण राणे : सध्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बाबतीतही काहीचं असंच झालं. शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये 1999 मध्ये नारायण राणे मुख्यमंत्री होते. त्यांना नंतर काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमध्ये महसूल आणि उद्योग हे खातं देण्यात आलेलं होतं.
  4. अशोक चव्हाण : अशोक चव्हाण 2008 मध्ये मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 2019 साली त्यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती.
  5. हे सुद्धा वाचा
  6. देवेंद्र फडणवीस : 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यानंतर आता ते शिंदे मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. दरम्यान, याआधी 80 तास टिकलेल्या सरकारमध्येही त्यांनी सलग दुसऱ्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली होती. पण नंतर अडीच वर्ष त्यांना विरोधी बाकांवर बसावं लागलं होतं. आता पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली ते काम करताना मंत्रिमंडळात दिसणार आहे.

शिवसेनेत बंड केल्यानंतर 9 दिवसांनी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बंडखोरीदरम्यान, त्यांनी सूरत, गुवाहाटी, गोवा आणि अखेरीस मुंबई असा प्रवास केला. आता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बंडखोरा आमदारांना सोबत घेऊन ते मुंबईत दाखल होतील. त्यासाठी ते पुन्हा गोव्यात गेलेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.