नागपुरात गडकरी-फडणवीस जोडीकडून भूमिपूजनाचा सपाटा
नागपूर : लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागण्यापूर्वी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक नव्या विकास कामांचे भूमिपूजन तर पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण करत निवडणुकांसाठी नागपुरात भाजपच्या तयारीवर अखेरचा हात फिरवला आहे. नागपुरात एकंदरीतच भूमिपूजनांचा सपाटा लावला आहे. नागपूरच्या फुटाळा तलाव शेजारी झालेल्या मुख्य कार्यक्रमात रेल्वे, नागपूर महापालिका, नागपूर मेट्रो रिजन विकास यंत्रणा, […]
नागपूर : लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागण्यापूर्वी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक नव्या विकास कामांचे भूमिपूजन तर पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण करत निवडणुकांसाठी नागपुरात भाजपच्या तयारीवर अखेरचा हात फिरवला आहे. नागपुरात एकंदरीतच भूमिपूजनांचा सपाटा लावला आहे.
नागपूरच्या फुटाळा तलाव शेजारी झालेल्या मुख्य कार्यक्रमात रेल्वे, नागपूर महापालिका, नागपूर मेट्रो रिजन विकास यंत्रणा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अशा अनेक विभागांशी संबंधित 16 विकास कामांचे ई-भूमिपूजन आणि ई-लोकार्पण केले गेले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजचा दिवस नागपूरसाठी ऐतिहासिक दिवस असल्याचे मत व्यक्त केले. आमच्या सरकारने नागपुरात फक्त इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास केलेला नाही, तर आम्ही नागपूरचा सर्वसमावेशक विकास करण्याचा प्रयत्न केला.
नागपूरच्या आणि विदर्भाच्या विकासासाठी गेल्या 50 वर्षात जेवढा निधी देण्यात आला नव्हता, त्यापेक्षा कितीतरी जास्त निधी आम्ही विदर्भासाठी दिला, असे सांगताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले, समृद्धी महामार्गामुळे ही विदर्भ समृद्धीकडे वळेल. तसेच, याच गतीने काम झाले तर पुढील पाच वर्षांनंतर विकासाचे एकही काम शिल्लक राहणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
याच कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी नागपूर महापालिकेच्या कामांची स्तुती केली. नागपूर महापालिका सांडपाणी विकून नफा कमावणारी देशातली पहिली महापालिका ठरली असून इथेनॉलच्या बसेस चालवणारी, दोन मजली पुलावरून मेट्रो चालवणारी ही नागपूर महापालिका देशात प्रथम आहे असा दावा नितीन गडकरी यांनी केला.
गडकरी-फडणवीस जोडीकडून भूमिपूजनाचा सपाटा
- नागपूर – नागभीड ब्रॉडगेज रेल्वे लाईनचा भूमिपूजन
- अजनी रेल्वे स्थानकावर एस्केलेटरचे भूमिपूजन
- अजनी इंटर मॉडेल रेल्वे स्टेशनचे भूमिपूजन
- नागपूर विमानतळावरील रेल्वे आरक्षण केंद्राचे लोकार्पण
- गोधनी येथे इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायविंग ट्रेनिंग एन्ड रिसर्च सेंटरचे भूमिपूजन
- केंद्रीय मार्ग निधीतूननागपूर शहरातील विविध रस्त्यांचे भूमिपूजन
- अंबाझरी तलावाच्या शेजारी विवेकानंद यांच्या प्रतिमेजवळ लेझर शो कामाचे भूमिपूजन
- अंबाझरी उद्यानात लेजर एन्ड लाईट शो कामाचे भुमिपूजन
- फुटाळा तालाच्या शेजारी म्यूजिकल फाउंटन च्या कामाचे भूमिपूजन
एकंदरीत नागपुरातील भूमिपूजन आणि लोकर्पणाचे कार्यक्रम पाहता, निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटला, असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही.