पंकजा म्हणाल्या, ‘माझे नेते मोदी-शाहा’, आता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

पंकजा मुंडे यांच्या भाषणावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही, असं 5 शब्दांचं उत्तर देऊन फडणवीसांनीही पंकजांना त्यांच्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे.

पंकजा म्हणाल्या, 'माझे नेते मोदी-शाहा', आता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे
Follow us
| Updated on: Jul 15, 2021 | 12:28 PM

मुंबई :  माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी थेट मोदी-शाहांचं नाव घेऊन राज्यातील नेत्यांना डावलल्याची खास करुन देवेंद्र फडणवीसांवर (Devendra fadanvis) अप्रत्यक्ष निशाणा साधल्याची चर्चा होती. आता पंकजा मुंडे यांच्या याच भाषणावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

पंकजांच्या भाषणावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

दोन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी भाषण केलं, तुम्ही ते भाषण ऐकलं का? असा प्रश्न पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना, ‘पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही’, असं म्हणत फडणवीसांनीही पंकजांना त्यांच्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे.

“पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही. आमचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पंकजा ताईंच्या भाषणावर खुलासा केला आहे. त्यांच्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर खुलासे केले आहेत. त्यावर मी बोलण्यात अर्थ नाही”, असं म्हणत ‘पंकजा’ या विषयावर फडणवीसांनी अधिक बोलणं टाळलं.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या?

नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा झाली. परंतु अखेरीस त्यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा होती. त्यात भरीस भर म्हणजे पंकजा मुंडे समर्थकांनी राजीनाम्याचं सत्र सुरु केलं. यानंतर पंकजा मुंडे यांनी दिल्ली वारी देखील केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांची पंकजांनी भेट घेतली. त्यानंतर वरळीत पत्रकार परिषद घेत “माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत. आम्ही कुणाला घाबरत नाही. मी कुणाचा निराधार करत नाही,” असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधल्याची चर्चा होती.

“आपली शक्ती कमी करण्याचा डाव आहे, पण आपण हा डाव पूर्ण होऊ द्यायाचा नाही. मला पुढेही खडतर मार्ग दिसतो आहे. योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते. आपण वारकरी आहोत, सात्विक आहोत. ज्या दिवशी छत अंगावर पडेल तेव्हा बघू”

माझा निवडणुकीत पराभव झाला. आज माझ्याकडे पदाचा अलंकार नाही. स्वाभिमानी राजकारण केले आहे. पंतप्रधानांनी मला झापल्याचं वृत्त काही माध्यमांनी चालवलं. मात्र माझ्या चेहऱ्यावर तसं काही दिसतं का? मला पंतप्रधानांनी कधी अपमानित केले नाही. नाही राष्ट्रीय अध्यक्षांनी अपमानित केले, असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.

(Devendra fadanvis first Reaction On Pankaja Munde Statement my leader Modi And Shaha)

हे ही वाचा :

माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शाह, पंकजा मुंडेंचा थेट देवेंद्र फडणवीसांवर निशाणा?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.