महापालिका निवडणुकांचा प्लॅन ठरला, डावपेचही ठरले, नितीन गडकरी-देवेंद्र फडणवीसांमध्ये महत्त्वाची बैठक
नागपूर महापालिकेची निवडणुकही आता तोंडावर आहे. त्यात पंचायत समिती-जि.प. निकालात काँग्रेसने दणदणीत कामगिरी केली आहे. या सगळ्या पार्श्वभूीवर या बैठकीत विचारमंथन झालं आणि रणनितीही आखण्यात आल्याची माहिती आहे.
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. काहीच महिन्यांवर असलेल्या महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने या भेटीत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. या भेटीवेळी भाजपचे कोअर कमिटीचे काही महत्त्वाचे पदाधिकारीही उपस्थित होते. नागपूर महापालिकेची निवडणुकही आता तोंडावर आहे. त्यात पंचायत समिती-जि.प. निकालात काँग्रेसने दणदणीत कामगिरी केली आहे. या सगळ्या पार्श्वभूीवर या बैठकीत विचारमंथन झालं आणि रणनितीही आखण्यात आल्याची माहिती आहे.
नितीन गडकरी-देवेंद्र फडणवीस भेट
देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट दिली. राज्यातील प्रमुख पक्षांनी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने सगळी तयारी सुरु केली आहे. भाजपनेही आता विविध शहरातील कारभारी-नेते मंडळींवर विशेष जबाबदारी सोपविण्याचं ठरवलं आहे. त्याच्याच रणनितीचा एक भाग म्हणून प्रमुख पदाधिकाऱ्यांसह फडणवीस-गडकरींमध्ये बैठक पार पडली. परंतु या बैठकीत नागपूर महापालिका या विषय अजेंड्यावर होता.
राज्यात सध्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार आहे. विचारांनी भिन्न असलेले तिन्ही पक्षात सध्या सत्तेत आहे. नुकत्याच जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुका पार पडल्या आहेत, निकालही लागलेत. त्यात भाजपने चांगली कामगिरी केलेली असली तरी सर्वोत्तम कामगिरी करणं जमलं नाही. त्यात नागपूर पंचायत समिती. जि.प. निकालात काँग्रेसने खूपच चांगली कामगिरी केलीय. साहजिकच भाजपसमोरची डोकेदुखी वाढलीय.
नागपुरात जि.प, पंचायत समितीमध्ये काँग्रेसची बाजी, भाजपसमोरचं टेन्शन वाढलं!
जिल्हा परिषदेच्या 85 आणि पंचायत समितीच्या 144 गणांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे या सारख्या प्रमुख भाजप नेत्यांचा गड असूनही काँग्रेसनं नागपूरमध्ये जोरदार मुसंडी मारली. नागपूरमध्ये मंत्री सुनील केदार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं पोटनिवडणुकीत बाजी मारली आहे.
महापालिका निवडणुकांची रणनिती
जि.प आणि पंचायत समितीमध्ये अनेक ठिकाणी तिन्ही पक्षांचं आव्हान भाजपला होतं. आता याच निकालातून धडा घेत भाजप त्या दृष्टीने डावपेच आखत आहे. कोणत्या महापालिकेत काय परिस्थिती आहे?, भाजपला कुठे अनुकुल वातावरण आहे?, कुठे आणखी जोर लावाला लागू शकतो?, कोणत्या महापालिकेची जबाबदारी कोणत्या नेत्यावर सोपवायची?, अशा अनेक विषयांवर गडकरी-फडमवीस यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.
हे ही वाचा :
एकाच विमानातून प्रवास, गप्पांची मैफल, इम्प्रेस सुजय विखेंकडून पार्थ पवारांसोबतचा फोटो शेअर