बाळासाहेबांना अभिवादन करायला लाज वाटते त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसता? एवढी लाचारी? फडणवीसांचा हल्लाबोल!
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी त्यांना अभिवादन करणारं साधं ट्विटही केलं नाही. आधी त्यांच्याकडून ट्विट करून दाखवा. ते ट्विटही करत नाहीत. तरीही तुम्ही त्यांच्या मांडिला मांडी लावून बसत आहात. किती लाचार आहात तुम्ही, असी टीका फडणवीस यांनी केली.
मुंबईः 25 वर्ष आम्ही भाजपसोबत युतीत सडलो, असे आरोप करणाऱ्या शिवसेनेला भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी चांगलंच फैलावर घेतलं. 2012 पर्यंत बाळासाहेब ठाकरे युतीचे नेते होते. त्यांच्या युतीच्या निर्णयावर तुम्ही बोट ठेवताय का, बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवलं, असं तुमचं म्हणणं आहे का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच काल 23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती होती. त्यानिमित्त जवळपास सर्वच भाजप नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना ट्विटद्वारे किंवा प्रत्यक्षपणे आदरांजली वाहिली. पण काँग्रेसकडून असं ट्वीट कधी झालंय का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मोदींपासून शहापर्यंत आणि फडणवीसांपर्यंत सर्वांनी बाळासाहेबांना ट्विटरवरून अभिवादन केलं. पण सोनिया गांधी, प्रियंका आणि राहुलने अभिवादनाचं ट्विट केलं नाही. आघाडीत असूनही त्यांनी अभिवादन केलं नाही, हे लक्षात आणून देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही बाळासाहेबांबद्दल नेहमी बोलतो त्यांना अभिवादन करतो. आमच्यासाठी ते वंदनीय आहेत. मात्र, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी त्यांना अभिवादन करणारं साधं ट्विटही केलं नाही. आधी त्यांच्याकडून ट्विट करून दाखवा. ते ट्विटही करत नाहीत. तरीही तुम्ही त्यांच्या मांडिला मांडी लावून बसत आहात. किती लाचार आहात तुम्ही. ज्यांना बाळासाहेबांना अभिवानद करायला लाज वाटते, त्यांच्यासोबत तुम्ही आहात अन् वर आम्हाला ज्ञान पाजळता?, अशी टीकाही त्यांनी केली.
भाजपची युती सोडल्यावर तुम्ही चौथ्या क्रमांकावर- फडणवीस
फडणवीस पुढे म्हणाले, ‘ भाजपसोबत लढलो असं सांगताना हे भाजपसोबत असताना पहिल्या क्रमांकावर गेले. भाजपला सोडल्यावर चौथ्या क्रमांकावर गेले याचा निर्णयही त्यांनी केला पाहिजे. कुणाकडे सडले. तेच तेच मुद्दे असतात. कदाचित शिवसैनिकांनाही तेच तेच भाषण पाठ झालं. राम जन्मभूमीच्या आंदोलनात कोण होते तुमचे?. लाठ्याकाठ्या आम्ही खाल्ल्या. तुम्ही तोंडाची वाफ दडवली. कोण होते तुम्ही? राम मंदिर-बाबरी सोडून द्या. मोदींनी करून दाखवलं. त्यांच्या नेतृत्वात तयार होत आहे राम मंदिर. तुम्ही साधा दुर्गाडी किल्ल्याचा आणि मलंगगडाचा प्रश्न सोडवला नाही, असे घणाघात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
इतर बातम्या-