ओबीसी इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम सदोष, राज्यातील ओबीसींचं मोठं नुकसान होईल, सरकारनं वेळीच जागं व्हावं, देवेंद्र फडणवीसांचा इशारा

सरकार सर्वेक्षणात जी आकडेवारी नोंद करत आहे, ती आकडेवारी खूप कमी आहे. इम्पेरिकल डेटा तयार करण्याच्या पद्धतीवर सरकारनं लक्ष घातलं नाही तर मला आणि भाजपाला माझ्याकडे असलेल्या आकडेवारीसह मैदानात उतरावं लागेल, असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे.

ओबीसी इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम सदोष, राज्यातील ओबीसींचं मोठं नुकसान होईल, सरकारनं वेळीच जागं व्हावं, देवेंद्र फडणवीसांचा इशारा
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 3:54 PM

मुंबईः  राज्यात ओबीसींचा इम्पेरिकल डेटा तयार करण्याचं काम सुरु आहे. मात्र सरकार वापरत असलेली पद्धत अत्यंत सदोष असल्याचा आरोप भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला आहे. ओबीसी समाजात अनेक वेगवेगळी आडनावं असतात. त्याचा अभ्यास करून संबंधित व्यक्ती कुठल्या समाजाची आहे, हे ठरवावं लागतं. मात्र सरकारचं सर्वेक्षणाकडे अजिबात लक्ष नाही. असंच चालू राहिलं तर सर्वेक्षणाअंती ओबीसींची (OBC) संख्या मोठ्या प्रमाणावर घटल्याचं दिसून येईल आणि याचा परिणाम पुढील आरक्षणावरही होईल, असा इशारा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. मुंबईत त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना हा विषय अधिक स्पष्टपणे मांडला. महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टासमोर (Supreme Court) ठेवलेली ओबीसी आरक्षणाविषयीची आकडेवारी सदोष असल्याचं मत कोर्टानं व्यक्त केलं होतं. त्यानंतर राज्य सरकारनं ओबीसी आयोगाची स्थापना करून नव्यानं इम्पेरिकल डेटा सर्वेक्षणाचं काम सुरु केलं आहे. या सर्वेक्षणावरच देवेंद्र फडणवीसांनी प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

ओबीसींच्या इम्पेरिकल डेटाविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ ओबीसी इम्पेरिकल डेटा तयार करण्याचं काम सुरु आहे. ही पद्धत सदोष आहे. याचा ओबीसींवर खूप मोठा परिणाम होणार आहे. कारण अनेक आडनावं वेगवेगळ्या समाजात असतात. त्यामुळे हा व्यक्ती कुठल्या समाजाचा आहे, हे ठरवावं लागतं. आताच्या सर्वेत ओबीसींची संख्या मोठ्या प्रमाणात घटलेला दिसेल. अशी पद्धत सुरु आहे. माझ्याकडे आलेली आकडेवारी मी योग्य वेळी सादर करेल. मी आजच अतिशय स्पष्टपणे सांगतो. सरकार नेहमीच उशीरा जागं होतं. या डेटात अनेक जिल्ह्यांचे ओबीसींच्या लोकसंख्येचे आकडे चूकत आहेत. त्यामुळे ओबीसींची संख्या खूप कमी संख्या सर्वेत दाखवली जाईल. यामुळे ओबीसीवर दुसऱ्याही आरक्षणात अन्याय होईल’ असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिलाय.

‘..अन्य़था भाजपला आणि मला मैदानात उतरावं लागेल’

सरकारने आमच्या इशाऱ्याकडे लक्ष दिलं नाही तर ओबीसींचं मोठं नुकसान होईल. कारण माझ्याकडे वेगळी आकडेवारी आहे. सरकार सर्वेक्षणात जी आकडेवारी नोंद करत आहे, ती आकडेवारी खूप कमी आहे. इम्पेरिकल डेटा तयार करण्याच्या पद्धतीवर सरकारनं लक्ष घातलं नाही तर मला आणि भाजपाला माझ्याकडे असलेल्या आकडेवारीसह मैदानात उतरावं लागेल, असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे.

‘पंकजाताई नाराज नाही, त्या मध्यप्रदेशात सक्रिय’

दरम्यान, विधान परिषदेत उमेदवारी न मिळाल्यानं पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. पंकजा मुंडेंच्या समर्थकांनीही मराठवाड्यात अनेक ठिकाणी याबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंकजा ताई मोठ्या नेत्या आहेत. मध्य प्रदेशचा चार्ज आहे. त्या सातत्याने तिथे जात असतात. तिथला प्रभार त्या सांभाळत आहेत. भाजपा हा एक परिवार आहे. त्यामुळे त्यांच्या नाराजीचं काहीही कारण नाही.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.