Video : मीरा भाईंदर महापालिका आयुक्तांवर देवेंद्र फडणवीस भडकले! नाराजी नाही मग नेमकं कारण काय?

देवेंद्र फडणवीस महापालिका आयुक्तांवर भडकल्याचं पाहायला मिळालं. कार्यक्रम पत्रिकेवर उद्घाटक म्हणून चौघांची नावं टाकण्यात आली होती. त्यावरुन फडणवीस यांनी आपण नाराज नाही. मात्र, उद्घाटक हा एकच असतो, असं आयुक्तांना आवर्जुन सांगितलं.

Video : मीरा भाईंदर महापालिका आयुक्तांवर देवेंद्र फडणवीस भडकले! नाराजी नाही मग नेमकं कारण काय?
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेतेImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 10:27 PM

ठाणे : मीरा भाईंदर (Mira Bhayander) महापालिकेतर्फे मीरा रोड परिसरातील धम्म सम्राट अशोक बुद्ध विहार, अग्निशमन विभागासाठी एएलपीजी वाहन आणि तरण तलावाचं उद्घाटन आज पार पडलं. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, शिवसेना आमदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस महापालिका आयुक्तांवर (Municipal Commissioner) भडकल्याचं पाहायला मिळालं. कार्यक्रम पत्रिकेवर उद्घाटक म्हणून चौघांची नावं टाकण्यात आली होती. त्यावरुन फडणवीस यांनी आपण नाराज नाही. मात्र, उद्घाटक हा एकच असतो, असं आयुक्तांना आवर्जुन सांगितलं.

‘मला उद्घाटनाच्या खूप संधी असल्यामुळे माझी नाराजी नाही’

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘कुठलंही उद्घाटन हा एक व्यक्ती करत असतो. तुमच्या पत्रिकेत चार उद्घाटक टाकले आहेत. त्यामुळे नेमकं कोण उद्घाटक हेच समजत नाही. म्हणजे त्याचं उद्घाटन आमचे मित्र एकनाथ शिंदेंनी केलं असतं तरी मला चाललं असतं, जितेंद्र आव्हाडांनी केलं असतं तरी मला चाललं असतं, दरेकरांनी केलं असतं तरी मला चाललं असतं, पण कुणीही केलं असतं तरी मला चाललं असतं. पण त्यात तुम्ही चार चार उद्घाटक दाखवले आहेत. खरं म्हणजे महानगरपालिकेत महापौर ठरवातात तेच उद्घाटक असतात, तेच पाहुणे असतात. त्यांना प्राधान्य देणं हे आपलं कर्तव्य असतं. तथापि मला उद्घाटनाच्या खूप संधी असल्यामुळे माझी काही नाराजी नाही. प्रोटोकॉलचा मुद्दा निघाल्यामुळे प्रोटोकॉल काय आहे हे आपल्यादेखील लक्षात आला पाहिजे, येवढ्यासाठी मी सांगितलं. पण आपण चांगलं काम करता. त्यामुळे असल्या छोट्या मुद्द्यावर विचलित होण्याचं काही कारण नाही. आपलं काम असंच सुरु ठेवा. पण ते करत असताना नगरसेवक, महापौरांना विश्वासात घ्या. त्यांचा अडकलेला फंड रिलिज झाला पाहिजे, त्यांनाही सगळ्या पद्धतीनं काम करण्याची सवलत मिळायला हवी. अन्यथा हा जो काही आपला गाडा आहे तो व्यवस्थित चालणार नाही’.

प्रताप सरनाईकांची कपिल पाटील, आठवलेंना विनंती

यावेळी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर 70 टक्के आणि माझ्यावर 30 ठक्के लक्ष दिलं. त्यामुळे मिरा भाईंदर शहरात तरण तलाव झाला. मी कपिल पाटील आणि आठवले साहेबांनाही विनंती करतो की शहरावर लक्ष द्यावं जेणेकरुन शहरात चांगला विकास होईल.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.