अशोकराव, तुम्ही मध्यस्थी करा, मुख्यमंत्र्यांना समजावा, बुलेट ट्रेनचं काम पूर्ण करा, देवेंद्र फडणवीसांची साद
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या कार्यक्रमात भाषण करताना बुलेट ट्रेनचा (Bullet Train) मुद्दा मांडला होता. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मत मांडलं आहे.
नांदेड : स्वर्गीय गंगाधरराव देशमुख यांच्या स्मृतिग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं राज्याचे दोन माजी मुख्यमंत्री एकाच मंचावर आलेले पाहायला मिळाले. काँग्रेस नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एकाच मंचावर आले होते. या कार्यक्रमाला खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी शिंदे आणि श्याम सुंदर शिंदे , भास्करराव पाटील खातगावकर, माजी मंत्री सूर्यंकांता पाटील आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या कार्यक्रमात भाषण करताना बुलेट ट्रेनचा (Bullet Train) मुद्दा मांडला होता. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मत मांडलं आहे. अशोक चव्हाण यांनी विदर्भात बुलेट ट्रेन जातीय त्याप्रमाणं नांदेड मार्गे हैदराबादला जावी, ती मराठवाड्यात यावी, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं होतं.हैदराबाद पर्यंतच्या बुलेट ट्रेनला मी पाठींबा देतो पण तुम्ही मुख्यमंत्र्यांना समजावा की मुंबईतील बुलेट ट्रेनचे काम थांबवू नका, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मुंबई- अहमदाबाद या बुलेट ट्रेनच्या कामात महाराष्ट्रात राजकारण आणलं जातंय. त्यामुळे आपल्याकडे काम रखडलय. मात्र गुजरातमध्ये काम वेगात आहे. जपान त्यासाठी अल्प दराने कर्ज देतेय पण छोटं राजकारण आणून काम थांबवली जातायत. हैदराबाद पर्यंतच्या बुलेट ट्रेनला मी पाठींबा पण देईन. तुम्ही मुख्यमंत्र्यांना समजावा की मुंबईतील बुलेट ट्रेनचे काम थांबवू नका, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. काही अधिकाऱ्यानी सरकारची दिशाभूल केली त्यातून राज्य सरकारने केंद्राच्या कुठल्याच कामात हिस्सा द्यायचं नाही, असं ठरवलं. अशोकराव, तुम्ही मध्यस्थी करा आणि हे काम पूर्ण करा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
बुलेट ट्रेन मराठवाड्यात यावी : अशोक चव्हाण
बुलेट ट्रेन विदर्भात चालली ठीक आहे. ती इकडे मराठवाड्यात यावी.समृद्धी महामार्ग नांदेडपासून पुढे हैद्राबाद पर्यंत वाढवा, असं अशोक चव्हाण म्हणाले. बुलेट ट्रेन नांदेड मार्ग हैदराबाद पर्यंत न्यावी. आपण दोघांनी प्रयत्न केले तर हे स्वप्न पूर्ण होईल, असं अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून केलं आहे.
गंगाधरराव देशमुख प्रगल्भ राजकारणी
आजच व्यासपीठ आणि समोरचे गर्दी पाहिली तर स्वर्गीय गंगाधरराव देशमुख हे मोठे श्रीमंत व्यक्ती होते. स्वर्गीय गंगाधरराव देशमुख हे प्रगल्भ राजकारणी होते, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. अशोकराव, आपण राजकीय विरोधक आहोत, शत्रू नाहीयेत, एकमेकांच्या घरी येजा करता आली पाहिजे, संबध राखता आले पाहिजे, स्वर्गीय गंगाधराव देशमुख यांच्या सारख्या लोकांमुळे हे संबंध टिकतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हा काळ संक्रमणाचा आहे, पुरोगामी राज्याची संस्कृती आपण जोपासणारे आहोत. समृद्धी महामार्गाच्या वेळेलाच बुलेट ट्रेन साठी जागा संपादित केलीय, नांदेड ते जालना या प्रस्तावित समृद्धी महामार्गा सोबतच बुलेट ट्रेन साठी जागा संपादित केली तर हे स्वप्न पूर्ण होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
इतर बातम्या :
मनसे कार्यालयाबाहेरील भोंगे पोलिसांनी उतरवले, महेंद्र भानुशाली पोलिसांच्या ताब्यात