औरंगजेबाच्या कबरीवर जाणं हा गुन्हा नाही, देवेंद्र फडणवीस यांची प्रकाश आंबेडकर यांना क्लिनचिट; विधानसभेत खडाजंगी

जरी एसआयटी नेमली नसली तरी या प्रकरणावर काही काम एटीएस करत आहे. काही काम आयबी करतंय. आम्हाला माहिती मिळतेय. गरज पडली तर एसआयटीही नेमू. महाराष्ट्रात दंगे होणे, महाराष्ट्रात तणाव राहणं योग्य नाही.

औरंगजेबाच्या कबरीवर जाणं हा गुन्हा नाही, देवेंद्र फडणवीस यांची प्रकाश आंबेडकर यांना क्लिनचिट; विधानसभेत खडाजंगी
devendra fadnavis Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 02, 2023 | 1:42 PM

मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : औरंगजेबाच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत जोरदार हंगामा झाला. औरंगजेबाचा स्टेट्स ठेवला म्हणून काही तरुणांवर कारवाई होते. मग औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्यावर कारवाई का होत नाही? असा सवाल समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केला. आझमी यांच्या या प्रश्नाला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले. औरंगजेबाच्या कबरीवर जाणं हा गुन्हा नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश आंबेडकर यांना क्लिनचिट दिली आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी मांडून औरंगजेबाच्या मुद्द्यावर सरकारचं लक्ष वेधलं. धर्मवीर संभाजीराजेंविरोधात कटकारस्थान करणाऱ्या औरंगजेबाचं स्टेट्स ठेवून वातावरण खराब केलं जात आहे. पोलिसांनी या संदर्भात कारवाई केली आहे. वंदे मातरम म्हणत नाहीत, पण जेव्हा मिरवणूक काढली जाते तेव्हा औरंगजेब माझा बाप आहे, असं सांगणारे काही लोक आहेत. हे गद्दार लोक आहेत. हे मुद्दामबोलत असतात. औरंगजेब तुम्हारा बाप है म्हणतात. राज्यातील अनेक जिल्ह्यात हे सुरू आहे, असं आमदार नितेश राणे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

त्यांना पाकिस्तानात पाठवा

या लोकांना वंदे मातरम म्हणायचे नाहीये. जिल्ह्या जिल्ह्यात सर तन से जुदा अशा घोषणा द्यायच्या आहेत. त्यांना राज्याचं वातावरण खराब करायचं आहे. या लोकांना शिवरायांच्या महाराष्ट्रात राहायचा अधिकार नाही. अशा लोकांनी पाकिस्तानात निघून जावे ना. गृहमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी. कशाला पाहिजे हे लोक? राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेची आम्हाला चिंता आहे. विविध जिल्ह्यात स्टेट्स ठेवणारी ही मुलं आहेत. त्यांचा मास्टरमाइंड कोण याची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमणार का? आपल्या विभागात काही लोक आहेत. हे लोक कारवाई करत नाहीत. त्यांची अंतर्गत चौकशी करणार का? असा सवाल नितेश राणे यांनी केला.

औरंगजेब हिरो होऊ शकत नाही

त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. या देशात औरंगजेब हा कुणाचा नेता होऊ शकत नाही. औरंगजेब मुसलमानाचाही नेता होऊ शकत नाही. त्याने या देशावर आक्रमण केलं होतं. ते टर्किक मंगोल होते. आपल्या देशातील मुसलमान या देशात जन्मलेले आहेत. भारतातील मुसलमान हा औरंगजेबाचा वंशज नाही. तो हिरो होऊ शकत नाही. हिरो फक्त शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आणि एपीजे अब्दुल कलाम होऊ शकतात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तरुणांना उचकावत आहे का?

यापूर्वी कधी कोणत्याही मुस्लिम समुदायाकडून औरंगजेबाचं स्टेट्स ठेवणं उदात्तीकरण करणं किंवा फोटो काढून मिरवणूक काढणं असं होत नव्हतं. यामागे कुणाचं डिझाईन आहे का? जाणीवपूर्वक तेढ निर्माण करणं हे यामागे आहे का? जाणीवपूर्वक कुणी डिझायन म्हणून समाजात तेढ निर्माण करण्यासाठी तरुणांना उचकावत आहे का? याचे काही इनपूट्स आमच्याकडे आहेत. ते सभागृहात सांगत नाही.

जरी एसआयटी नेमली नसली तरी या प्रकरणावर काही काम एटीएस करत आहे. काही काम आयबी करतंय. आम्हाला माहिती मिळतेय. गरज पडली तर एसआयटीही नेमू. महाराष्ट्रात दंगे होणे, महाराष्ट्रात तणाव राहणं योग्य नाही. राज्यावर त्याचा परिणाम होत असतो, असं सांगतानाच योग्यवेळी कारवाई झाली असती तर घटना टळू शकली असती. काही ठिकाणी जाणीवपूर्वक घटना टाळली नाही. जर कोणत्या पोलिसांची दिरंगाई असेल तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

देशात दोन कायदे आहे काय?

यावेळी समाजवादी पार्टीचे नेते, आमदार अबू असीम आजमी यांनी आपली भूमिका मांडली. काही मुस्लिम तरुणांनी स्टेट्स ठेवला. त्यांच्यावर कारवाई केली. मी समजू शकतो. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरस्तानावर जाऊन तिथे फुले वाहिली. कुणात दम असेल तर माझ्यावर केस करून दाखवा, असं आव्हानच प्रकाश आंबेडकर यांनी दिलं. एकाने स्टेट्स ठेवला म्हणून कारवाई केली जाते. दुसरा आव्हान देतो तरी काही होत नाही. या देशात दोन कायदे आहेत काय? असा सवाल अबू आझमी यांनी केला.

बुरखा घालून, दाढी वाढवून फिरणं मुश्किल

ट्रेनमध्ये जी घटना घडली ती याच कारणाने झाली. द्वेष पसरवण्याचं काम सुरू आहे. मुस्लिमांना हिंदूंमध्ये बदनाम केलं जात आहे. देशभर हेच सुरू आहे. आता बुरखा घालून आणि दाढी वाढवून ट्रेनमधून प्रवास करणंही मुश्किल झालं आहे. आमची कौम ओरडत आहे. पण कोणीही मदत करत नाही. हे मला गद्दार म्हणतात. तेच गद्दार आहेत. नथुराम गोडसेचा फोटो लावला जाऊ शकतो. गांधीजींच्या मारेकऱ्याचा प्रचार केला जातो. हे जाणूनबुजून केलं जात आहे. देशाचं वातावरण खराब केलं जात आहे, असा हल्लाच आझमी यांनी चढवला.

आंबेडकरांना आवाहन केलं होतं

आझमी यांच्या आरोपांचं देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ खंडन केलं. बाळासाहेब आंबेडकर कबरीवर गेले होते. त्यांना मी आवाहन केलं होतं. तुम्ही कबरीवर जाऊन औरंगजेबाचं महिमामंडन करू नका, असं मी प्रकाश आंबेडकरांना सांगितलं. औरंगजेब शासक होता. त्यांचा मृत्यू झाला. मजार तिथे आहे. ती संरक्षित आहे. आपण लोकशाहीत आहोत. इतर देशातील व्यक्तीचं निधन झालं तरी त्याचं या देशात दफन केलं जातं. दोन धर्मात तेढ निर्माण करणं हा गुन्हा आहे. औरंगजेबाच्या कबरीवर जाणं गुन्हा नाही, असं फडणवीस म्हणाले.

मतांसाठी काहीही करू नका

स्टेट्समध्ये हाच तुमचा बाप आहे, हाच सगळा हे आहे असं लिहिलं जातं हा गुन्हा आहे. मला आजमींना सांगायचं आहे. लोकशाहीत आपण निवडून येतो. प्रत्येकाला आपला मतदारसंघ पाहायचा आहे. पण हे पाहत असताना काही गोष्टी राष्ट्रहिताच्या असतात. त्यावेळी तडजोड करू नये. देशाचा इतिहास पाहिला तर अनेक मुस्लिम नेत्यांनी या देशासाठी बलिदान केलं. त्यांनी हा विचार केला नाही. कोण कोणत्या जातीचा आहे हे पाहिलं नाही. त्यांनी देश पहिला असं म्हटलं. मतांच्या लांगूलचालनासाठी काहीही करू नका, असं आवाहन करतानाच धर्माच्या आधारावर कुणालाही दुय्यम वागणूक दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.