काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, पटोले-वडेट्टीवारांमध्ये फडणवीसांचा मिठाचा खडा

"काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी विरोधी पक्षनेत्यांच्या अधिकारावर अतिक्रमण केलं. आता अध्यक्षांचं आम्हालाही ऐकावं लागतं. आमचे अध्यक्ष बावनकुळे मला सांगतात, ते मलाही ऐकावं लागतं. तसं नाना पटोले यांनी अंतिम आठवडा प्रस्ताव हा विरोधी पक्षनेत्याची प्रॉपर्टी आहे, त्यांना तो वापरायला द्यायला हवा होता", असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी टोलेबाजी केली.

काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, पटोले-वडेट्टीवारांमध्ये फडणवीसांचा मिठाचा खडा
Follow us
| Updated on: Dec 20, 2023 | 9:44 PM

नागपूर | 20 डिसेंबर 2023 : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आज सभागृहात जोरदार टोलेबाजी बघायला मिळाली. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये टोले, टोमणे लगावले जात होते. पण अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात नेते एकमेकांना चिमटे काढत होते. या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा उल्लेख करत काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी फडणवीसांनी चांगलीच टोलेबाजी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावला. त्यानंतर फडणीसांनी थेट काँग्रेसवर निशाणा साधला. “वर्धा जिल्ह्यातील आर्वी, आष्टी येथील आपुऱ्या आरोग्य व्यवस्था पाहता असा निर्णय घेण्यात आला आहे की, तळेगाव तालुका आष्टी येथे नव्याने मान्यता देण्यात आलेल्या 300 खाटांच्या सामान्य रुग्णालयाच्या उभारण्यास गती देण्यात येईल. तिथे देखील राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकाची पूर्तता झालेल्या नंतर जागतिक बँकेसोबत महाराष्ट्र सरकारच्या झालेल्या करारानुसार पीपीपी तत्वावर वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत शासन प्राधान्याने विचार करेल”, असं फडणवीस म्हणाले.

तालिका अध्यक्षांनी मानले फडणवीसांचे आभार

खरंतर वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत हिंगणघाटचे आमदार समीर कुणवार यांनी केली होती. तालिका अध्यक्ष समीर कुणवार यांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर या मागणीसाठी आंदोलन केलं होतं. त्यानंतर फडणवीसांनी त्यांची भेट घेतली होती. त्यांच्या मागणीबाबत फडणवीसांनी घोषणा केली. यावेळी समीर कुणवार हे सभागृहात तालिका अध्यक्ष म्हणून अध्यक्षाच्या जागेवर बसले होते. फडणीसांच्या घोषणेनंतर तालिका अध्यक्षांनी आभार मानले. पण त्यावरुन जयंत पाटलांनी चिमटे काढले.

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

“अध्यक्ष महोदय, मी अभिनंदन करतो की, त्यांनी तुमच्या मतदारसंघासाठी हे हॉस्पिटल दिलं, पण ते अध्यक्ष महोदय कधी दिलं? त्यांनी ठासून तुमचा आग्रह धरला म्हणून त्यांनी घोषणा केली. तिथे 210 लोकं उपोषण करत आहेत. त्यामुळे खरंच मागणी होती. तुम्ही तिथले आमदार आहात. मी तुम्हाला त्यासाठी जोरात बोला जेणेकरुन इथे ऑर्डर निघेल. देवेंद्र फडणवीस हे मोकळ्या मनाचे आणि खुले आहेत. त्यांना जे योग्य वाटलं ते आधीच करायला हवं होतं. तुम्हाला इतका वेळ ताणायला नको होतं. पण त्यांनी चांगल्या कामांना मान्यता दिली. त्याबद्दल अभिनंदन”, अशी टोलेबाजी जयंत पाटलांनी केली.

देवेंद्र फडणीसांचं प्रत्युत्तर

जयंत पाटील यांच्या टोलेबाजीला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. “अंतिम आठवडा प्रस्तावावर नाना पटोल, अमित साटम, अनिल देशमुख, प्रतिभा धानोरकर, रवींद्र वायकर, सुनील राणे, सुनील टिंगरे, अबू आझमी, रोहित पवार, राम कदम, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार आणि इतर सर्व सभासदांनी आपलं म्हणणं मांडलं. ज्यांनी प्रस्ताव मांडला ते नाना पटोले या ठिकाणी नाहीत. पण मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं विरोधी पक्षाने या संपूर्ण अधिवेशनात विदर्भाच्या चर्चेचा एकही प्रस्ताव दिला नाही”, असं फडणवीस म्हणाले.

“खरंतर माझी अपेक्षा होती, अंतिम आठवडा प्रस्तात तरी विरोधी पक्ष विदर्भाच्या चर्चेबाबत देईल. आमच्या विदर्भाचे सुपुत्र विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते आहेत. नाना पटोले हे विदर्भाचे आहेत. मला त्यांच्याकडून विदर्भाच्या प्रस्तावाची अपेक्षा होती. मी अतिशय खेद व्यक्त करतो की, विदर्भात अधिवेशनाला आलेल्या विरोधी पक्षाला विदर्भाचा विसर पडला ही गोष्ट अतिशय चिंताजनक बाब आहे”, असं फडणवीस म्हणाले.

विजय वडेट्टीवार यांचा उल्लेख करत फडणीसांची टोलेबाजी

“अंतिम आठवडा प्रस्ताव हा विरोधी पक्षनेत्यांनी मांडायचा असतो. तो त्यांचा अधिकार आहे. पण काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी विरोधी पक्षनेत्यांच्या अधिकारावर अतिक्रमण केलं. आता अध्यक्षांचं आम्हालाही ऐकावं लागतं. आमचे अध्यक्ष बावनकुळे मला सांगतात, ते मलाही ऐकावं लागतं. तसं नाना पटोले यांनी अंतिम आठवडा प्रस्ताव हा विरोधी पक्षनेत्याची प्रॉपर्टी आहे, त्यांना तो वापरायला द्यायला हवा होता. पण जसं पक्षामध्ये तुम्हाला जसं डावललं जातं विजय भाऊ…”, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावला.

देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला जयंत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं. “विदर्भाचा विषय सत्तारुढ पक्षाने मांडल्यामुळे आम्ही मांडला नाही. अर्थमंत्र्यांनी काल बीएसीमध्ये सांगितलं की, आम्ही हा प्रस्ताव वेळ नसेल तर विथड्रॉ करतो, आता अध्यक्ष महोदय अजून सभागृह संपलेलं नाही. त्यामुळे चर्चो होणार आहे, असं आम्ही गृहित धरुन आहोत. दहा दिवसांचं अधिवेशन घ्यायचं, तिकडून दोन प्रस्ताव, इतकडून एक प्रस्ताव, एवढं लिमिटेड का? म्हणून आम्ही म्हणत होतो, एक महिना अधिवेशन घ्या. आम्हालाही आणखी दिवस नागपूरची हवा घेऊ द्या”, असं जयंत पाटील म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.