AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : ‘मुंबई मेली तरी चालेल’, ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराची यादी फडणवीसांनी वाचली, मुख्यमंत्र्यांच्या जिव्हारी?

Devendra Fadnavis : मुंबई मेली तरी चालेल पण आपलं घर भरणं मात्र जोरात सुरु आहे, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांना टीका केली आहे.

Devendra Fadnavis : 'मुंबई मेली तरी चालेल', ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराची यादी फडणवीसांनी वाचली, मुख्यमंत्र्यांच्या जिव्हारी?
देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत हल्लाबोलImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 6:41 PM

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत (Mumbai) सुरु असलेल्या भ्रष्ट्राचारावरुन जोरदार हल्लाबोल केलाय. विधानसभेत त्यांनी मुंबईला नेमकं लुटतंय कोण? याचा पाढाच वाचून दाखवला आहे. कोविड कंत्राट देण्यावरुन झालेल्या घोटाळ्यावरुन त्यांना शिवसेनेवर थेट निशाणा साधलाय. मुंबई मेली तरी चालेल पण आपलं घर भरणं मात्र जोरात सुरु आहे, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) टीका केली आहे. ‘आम्ही बोललो तर आम्ही मुंबई, महाराष्ट्र, मराठी माणसाचे शत्रू’ असं हिणवलं जात असल्याचा आरोप त्यांनी विधानसभेत बोलताना केला आहे. दरम्यान, आता मात्र प्रत्येकाला मुंबईचा शत्रू कोण आहे, हे लक्षात आलं आहे, असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर टीकेची तोफ डागली आहे. कोण प्रेताच्या टाळूवरचं लोणी खातंय? हे आता सगळ्यांना कळलंय, असंही फडणवीस यांनी विधानसभेत (Maharashtra Assembly Session) बोलताना म्हटलंय.

कोविड सेंटरच्या घोटाळ्यावरुन आरोप

कोविड सेंटरचं काम कुणाकुणाला दिली गेली, त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी हल्लाबोल केलाय. कोविड केअर सेंटरचा चांगली नावं देऊन किंवा प्रतिष्ठीत कंपन्यांच्या नावाशी साधर्म्य असलेली नावं देऊन काम देण्यात आल्याचा आरोप यावेळी फडणवीसांनी केलाय. इतकंच काय तर पाच कोविड सेंटरच्या 100 कोटींची कंत्राटं ही पदाधिकाऱ्यांच्याच नातेवाईकांना देण्यात आली असल्याचा हल्लाबोल फडणीसांनी केलाय.

नेमकं काय म्हणाले फडणवीस?

कोविड सेंटर घोटाळ्यावरुन सभागृहाचं लक्ष वेधून घेताना फडणवीसांनी म्हटलंय की,…

‘अनुभव नसलेल्या लोकांना काम द्यायचं. त्या ठिकाणी रुग्ण आला की नाही त्याला 50 टक्के रक्कम दिली गेली. कारण, आपल्याच कुणालातरी कोविड सेंटर देण्यात आली होती. दादा तुम्ही पुण्यातून 15 दिवसांत हाकललं. त्यांनाच मुंबईत 5 कोविड सेंटरचं कंत्राट देण्यात आलं. पण त्यावर कुठली कारवाई होताना दिसत नाही.’

दरम्यान, मुंबईतीतल मुलुंड कोविड सेंटरचं काम घाईघडबडीत देण्यात आल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय. आपल्याच एकाच्या आशा कॅन्सर ट्रस्टला ही कामं देण्यात आल्याचंही फडणवीसांनी यावेळी नमूद केलंय. या सगळ्यांची कुठे नोंदच नसल्याचाही सनसनाटी आरोपही फडणवीसांनी केलाय. महिन्याभरातच त्यांची पोलखोल झाली आणि महिन्यात त्यांचं कंत्राट रद्द झालं, असा आरोपही फडणवीसांनी केलाय.

मुख्यमंत्र्यांच्या जिव्हारी?

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या आरोपामुळे आता शिवसेना आणि मुंबई पालिकेतील भ्रष्ट्राचाराचा मुद्दा पुन्हा गाजण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्या यांनीही यावरुन सनसनाटी आरोप केले होते. कोविड केअर सेंटर घोटाळ्याचा विषय आता आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणखी तापण्याची चिन्ह असून यावर आता मुख्यमंत्री नेमकी काय प्रतिक्रिया देतात, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर दुसरीकडे कोविड सेंटर घोटाळ्यावरुन शिवसेनाला कोंडीत पकडण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय.

 Video | पाहा काय म्हणाले फडणवीस :

संबंधित बातम्या :

क्लास बंद, ग्लास सुरु, फडणवीसांनी महाविकास आघाडीचा तीन नावात निकाल लावला, ठाकरे-पवारांच्या जिव्हारी?

सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला मोठा झटका; परमबीर सिंहांच्या सर्व प्रकरणांची चौकशी आता सीबीआयकडे

यापुढे कोणत्याही साखर कारखान्याला हमी नाही, अजित पवारांची सभागृहात मोठी घोषणा

पाकचा लष्कर प्रमुख भेदरला, कारवाईच्या भितीची धास्ती अन् लपून बसला...
पाकचा लष्कर प्रमुख भेदरला, कारवाईच्या भितीची धास्ती अन् लपून बसला....
पहलगाम हल्ल्यानंतरचा CCTV समोर, जीव मुठीत घेऊन पर्यटकांची धावाधाव अन्
पहलगाम हल्ल्यानंतरचा CCTV समोर, जीव मुठीत घेऊन पर्यटकांची धावाधाव अन्.
भाजप माजी नगरसेवकाच्या आजी-माजी समर्थकांमध्ये राडा, तलवारी, रॉड अन्...
भाजप माजी नगरसेवकाच्या आजी-माजी समर्थकांमध्ये राडा, तलवारी, रॉड अन्....
9 तारखेच्या आतच काम होणार तमाम? पाकिस्तानला PM मोदींचा मोठा इशारा काय?
9 तारखेच्या आतच काम होणार तमाम? पाकिस्तानला PM मोदींचा मोठा इशारा काय?.
HSC : ऑल द बेस्ट पोरांनो, बारावीचा आज निकाल, कुठे पाहता येणार रिझल्ट?
HSC : ऑल द बेस्ट पोरांनो, बारावीचा आज निकाल, कुठे पाहता येणार रिझल्ट?.
जंगल मंगल कॅम्पचे सॅटेलाइट फोटो व्हायरल
जंगल मंगल कॅम्पचे सॅटेलाइट फोटो व्हायरल.
भारताचा आणखी एक कठोर निर्णय, पाकिस्तानची कोंडी वाढली
भारताचा आणखी एक कठोर निर्णय, पाकिस्तानची कोंडी वाढली.
अटारी बॉर्डरच्या जवळील गावात सापडली संशयास्पद वस्तू
अटारी बॉर्डरच्या जवळील गावात सापडली संशयास्पद वस्तू.
मुंडेंकडून 18 तुकडे करण्याची धमकी; करुणा शर्मांचा गंभीर आरोप
मुंडेंकडून 18 तुकडे करण्याची धमकी; करुणा शर्मांचा गंभीर आरोप.
पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?
पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?.