Devendra Fadnavis : ‘आम्हाला हिंदुत्वाची शाल पांघरण्याची गरज नाही’, फडणवीसांचा शिवसेनेला टोला, पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं

भाजप हिंदुत्ववादाची वाहक आहे. आम्हाला हिंदुत्वाची शाल पांघरण्याची गरज नाही. हिंदुत्व ही संकल्पना संकुचित संकल्पना नाही, असा दावाही फडणवीसांनी केला. पुण्यात प्रा. ना. स. फरांदे स्मृती प्रतिष्ठान तर्फे आयोजित दीपस्तंभ ग्रंथाचं प्रकाशन सोहळा पार पडला.

Devendra Fadnavis : 'आम्हाला हिंदुत्वाची शाल पांघरण्याची गरज नाही', फडणवीसांचा शिवसेनेला टोला, पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं
देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 4:57 PM

पुणे : राज्यात सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राजकारणच चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे लावून धरलाय. तर शिवसेना नेतेही आम्ही महाविकास आघाडीसोबत सत्तेत असलो तर आम्ही हिंदुत्व सोडलं नसल्याचं सांगत आहेत. अशावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याच मुद्द्यावरुन शिवसेनेला (Shivsena) जोरदार टोला लगावलाय. भाजप हिंदुत्ववादाची वाहक आहे. आम्हाला हिंदुत्वाची शाल पांघरण्याची गरज नाही. हिंदुत्व ही संकल्पना संकुचित संकल्पना नाही, असा दावाही फडणवीसांनी केला. पुण्यात प्रा. ना. स. फरांदे स्मृती प्रतिष्ठान तर्फे आयोजित दीपस्तंभ ग्रंथाचं प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते.

‘भाजप हिंदुत्ववादाचा वाहक आहे’

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी 370 कलम हटवून दाखवलं. आताच्या हिंदुत्व विचारांची वाहक केवळ भाजपा आहे. हिंदुत्व ही संकल्पना संकुचित नाही. केवळ पूजापाठ म्हणजे हिंदुत्ववाद नाही. भाजप हिंदुत्ववादाचा वाहक आहे. आम्हाला हिंदुत्वाची शाल पांघरण्याची गरज नाही. पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वात भारत पुढे चालला आहे. रशिया आणि यूक्रेन युद्धात मध्यस्ती कोण करु शकतो तर मोदी करु शकतात. भारत विश्वगुरु झाला पाहिजे आणि त्यासाठी भाजप उपकरण झालं पाहिजे, असं मतही फडणवीसांनी यावेळी व्यक्त केलं.

‘..तरीही भ्रष्टाचार बाहेर काढत राहू’

अंदमानचे आदिमानव, बंगालचे ब्राह्मण, दक्षिणेतील नायर, उत्तर प्रदेशातील दलित सांगळ्यांचा बाप एकच असल्याचं संशोधनातून सिद्ध झालंय. आर्य बाहेरून आले नव्हते हे सिद्ध झालंय, असा दावाही फडणवीसांनी केलाय. ज्या प्रकारे आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढत आहोत. त्यामुळे त्यांची अस्वस्थता वाढली आहे. म्हणून आमच्यावर हल्ले केले जात आहेत. आमच्या गाड्या फोडण्याचा प्रयत्न होतोय. आम्ही तरीही भ्रष्टाचार बाहेर काढत राहू, असा इशाराही फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारला दिलाय.

इतर बातम्या :

Amravati | अचलपूर दंगल प्रकरणी अनिल बोंडेंना पोलिसांनी ताब्यात घ्यावे, काँग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकरांची मागणी

bjp pol khol campaign: कुठल्या तरी गर्दुल्याला किंवा निर्दोष व्यक्तीला पकडणार हे चालणार नाही, प्रवीण दरेकर यांचा इशारा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.