राजू शेट्टी सरकारी आंदोलक, त्यांची लुटूपुटूची लढाई सरकार वाचवण्यासाठी : देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी दूध दरवाढ आंदोलनावर बोलताना शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यावर सडकून टीका केली आहे (Devendra Fadnavis criticize Raju Shetti).
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दूध दरवाढ आंदोलनावर बोलताना शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यावर सडकून टीका केली आहे (Devendra Fadnavis criticize Raju Shetti). राजू शेट्टी हे सरकारी आंदोलक आहेत. त्याची लुटूपुटूची लढाई केवळ सरकार वाचवण्यासाठी आहे, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी दूध दरवाढीचं समर्थन करताना सध्या मिळणाऱ्या दरातून गाईच्या चाऱ्याचा खर्चही निघत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या अडचणीच्या काळात दूध उत्पादक शेतकरी हा दुधाच्या उत्पन्नावर जगतो आहे. ज्यावेळी दुधाचे दर कमी होतात त्यावेळी दर स्थिर करण्यासाठी सरकार अनुदान देतं. सध्या शेतकऱ्यांच्या दुधाला मिळणाऱ्या दरात गाईच्या चाऱ्याचा खर्चही निघत नाही. असं असतानाही सरकारकडून कुठलेही अनुदान मिळत नाही हे दुर्दैवी आहे. राजू शेट्टी लुटूपुटूची लढाई करत आहेत. ते सरकारमध्ये आहेत. त्यामुळे ही फक्त सरकार वाचवण्यासाठीची लढाई आहे. राजू शेट्टी सरकारी आंदोलक झाले आहेत.”
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब थोरात याचे दावेही फेटाळले. बाळासाहेब थोरात यांची माहिती चुकीची आहे. देशात एक ग्रामही दुधाची भुकटी आयात झालेली नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
“भाजपचं राज्य सरकारविरोधातील आंदोलन म्हणजे पुतणा-मावशीचं प्रेम”
राजू शेट्टी म्हणाले, “दूध उत्पादकांना तातडीने दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने त्यांच्या थेट खात्यावर प्रतिलिटर किमान 5 रुपये जमा करणं हाच उपाय आहे. आगामी दोन ते तीन दिवसात राज्य सरकारने हा निर्णय न घेतल्यास सरकारला उग्र आंदोलनाला सामोरं जावं लागेल.”
“आज भाजप आणि विरोधीपक्ष केवळ राज्य सरकारविरोधात आंदोलन करत असतील तर हे पुतणा-मावशीचं प्रेम आहे. कारण ठोस उपाययोजना ही केंद्र सरकारनेच केली पाहिजे. आयात थांबवली पाहिजे. निर्यातील अनुदान द्यायला हवं. तसेच जीएसटी मागे घेतला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने अभूतपूर्व संकटात सापडलेला दूध उत्पादक यातून बाहेर पडेल,” असंही राजू शेट्टी यांनी सांगितलं.
अलिकडे फडणवीसांचे मुहूर्त चुकतात, मुश्रीफांचा टोला
राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली (Hasan Mushrif on Milk Agitation). अलिकडे फडणवीसांचे सगळेच मुहूर्त चुकत आहेत. दूध आंदोलनासाठी त्यांनी काढलेला मुहूर्तही चुकीचा आहे. शासकीय सुट्टीच्या दिवशी आंदोलनाकडे कोण लक्ष देणार? असा प्रश्न मुश्रीफ यांनी उपस्थित केला.
हसन मुश्रीफ म्हणाले, “दुध आंदोलनासाठी देवेंद्र फडणवीस यांनी काढलेला मुहूर्त चुकीचा आहे. बकरी ईद, शासकीय सुट्टीच्या दिवशी आंदोलनाकडे कोण लक्ष देणार? अलीकडे फडणवीस यांचे सगळेच मुहूर्त चुकत आहेत.”
संबंधित व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
हे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका, राम शिंदे यांचं टीकास्त्र
Devendra Fadnavis criticize Raju Shetti