AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पुण्याचं पाणी पळवतील त्यांना पुणेकर पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत’, देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांवर निशाणा

निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. ज्या दिवशी आम्ही शक्ती प्रदर्शन करुन त्या दिवशी आम्हाला एवढी छोटी जागा पुरणार नाही. पुणे महापालिकेत जास्त संख्येनं भाजपचे नगरसेवक निवडून येतील, असा दावा करत फडणवीस यांनी पुणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकल्याचं पाहायला मिळालं.

'पुण्याचं पाणी पळवतील त्यांना पुणेकर पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत', देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांवर निशाणा
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Follow us
| Updated on: Dec 03, 2021 | 9:33 PM

पुणे : ‘जे पुण्याचं पाणी पळवतील त्यांना पुणेकर पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत’, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधलाय. पुणे शहराचा पाणीपुरवठा 3 डिसेंबरपासून कमी केला जाणार आहे. भामा आसखेड धरणातून केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. भाजप कार्यालयाच्या उद्घाटनासाठी फडणवीस पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) आणि खास करुन राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.

पुण्याच्या पाणी प्रश्नावरुन सध्या जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. हाच धागा पकडत देवेंद्र फडणवीस यांनी जे पुण्याचं पाणी पळवतील त्यांना पुणेकर पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा दिलाय. निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. ज्या दिवशी आम्ही शक्ती प्रदर्शन करुन त्या दिवशी आम्हाला एवढी छोटी जागा पुरणार नाही. पुणे महापालिकेत जास्त संख्येनं भाजपचे नगरसेवक निवडून येतील, असा दावा करत फडणवीस यांनी पुणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकल्याचं पाहायला मिळालं.

‘महापालिकेवर पुन्हा भाजपचा भगवा, आरपीआयचा निळा झेंडा फडकणार’

मला प्रश्न विचारला की हे शक्तीप्रदर्शन आहे का? मी सांगितलं हे कार्यकर्ते उत्साहानं आले आहेत. आम्ही शक्तीप्रदर्शन करायचं म्हटलं तर पुण्यातील एकही मैदान पुरणार नाही. पुणे महापालिकेवर पुन्हा भाजपचा भगवा आणि आरपीआयचा निळा झेंडा फडकेल. मला अलिकडच्या काळात भाजपचा भगवा सांगावा लागतो. ज्यांना भगव्याचा मान नाही, हिंदुत्ववादी म्हणून घ्यायची लाज वाटते, अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत, अशा शब्दात फडणवीस यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलंय.

फडणवीसांची शिवसेनेवर घणाघाती टीका

लोकसभेच्या 12 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यात शिवसेनेचे दोन खासदार होते. तेव्हा माफी मागायला आम्ही काय सावरकर आहोत का? असं शिवसेनेचे खासदार म्हणतात. अरे निर्लज्जांनो तुम्हाला लाज वाटली पाहिजे. त्यांच्या नखाची सरही तुम्हाला येऊ शकत नाही. होय आम्ही सावरकरवादी आहोत हे आम्ही ठणकावून सांगणार, असंही फडणवीस यावेळी म्हणाले. एका नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे. मोदींच्या नेतृत्वात लस तयार झाली नसती तर काय झालं असतं. अमेरिकेनं सांगितलं असतं की आमचं झाल्याशिवाय आम्ही देणार नाही. मात्र, सिरम असेल की भारत बायोटेक, यांना सोबत घेऊन, मदत करुन, त्यांना पैसे देऊन भारतात लस तयार केली. 100 कोटी लस मोफत दिली. महाराष्ट्र सरकारचे दोन वर्षे पूर्ण झाले तेव्हा सांगत होते. या लसी जमिनीतून पैदा झाल्या की आकाशातून टपकल्या. मोदींनी तुम्हाला लस दिली म्हणून तुम्ही 10 कोटी लसीकरण करु शकला, अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केलीय.

सामान्यांसाठी आमची महापालिका जागत होती. राज्य सरकारनं काय केलं?

या ठिकाणी वसूली हा एकच धंदा आहे. इथली नोकरी संपुष्टात येतेय. नेत्यांनी नोकरशाही संपुष्टात आणली. नेतेच वसुली, सक्तवसुली करत आहेत, असा टोला फडणवीसांनी लगावला. तर पुण्यात आमच्या महापालिकेनं रस्त्यावर येऊन काम केलं. सामान्यांसाठी आमची महापालिका जागत होती. राज्य सरकारनं काय केलं? एक पैशाचंही अनुदान राज्य सरकारनं दिलं नाही. महापौर कोरोना काळात रस्त्यावर होते. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता काम केलं. भाजप हे सेवेचं संघटन आहे, असंही ते म्हणाले.

‘पुण्याला देशातील सर्वोत्तम शहर बनवल्याशिवाय राहणार नाही’

भाजपला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून मान्यता आहे. चांगलं कार्यालय सुरु झालंय. जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत. पुणेकरांच्या मनात भाजप आहे. वर्षानुवर्षे ही पालिका काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. इथं भ्रष्टाचाराचा अड्डा होता. मेट्रो असेल, पिण्याच्या पाण्याची योजना असेल. पुढच्या 25 वर्षाचं नियोजन करुन विकास केला. देशातील सर्वोत्तम शहर बनवल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मागे जायला जनता तयार नाही. पुण्यात शिवसेना आता नावालाही उरलेली नाही, असा घणाघात फडणवीस यांनी केलाय.

इतर बातम्या :

‘ईडापिडा टळो, लोकशाही बलवान होवो’; साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन भुजबळांची फटकेबाजी

‘मेस्मा कायदा अत्यावश्यक सेवेसाठी लागतो, एसटी अत्यावश्यक सेवेत येते’, अनिल परबांचा सूचक इशारा

'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?.
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू.
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी.
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय.
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं..
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्....
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय...
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय....
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी.