‘हे तर अपरिपक्वतेचं लक्षण’, मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रावरुन फडणवीसांचा टोला

राज्यपालांनी महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांना विनंती करुन संसदेचं चार दिवसीय विशेष सत्र बोलावण्याची मागणी केली आहे. त्यावर आता भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली जातेय. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी अपरिपक्वतेचं दर्शन घडवल्याचा जोरदार टोला लगावलाय.

'हे तर अपरिपक्वतेचं लक्षण', मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रावरुन फडणवीसांचा टोला
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 5:29 PM

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात पत्रसंघर्ष पाहायला मिळत आहे. साकीनाका बलात्कार प्रकरण आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरुन राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर काल मुख्यमंत्र्यांकडून राज्यापालांना खरमरीत उत्तर देण्यात आलं. राज्यपालांनी महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांना विनंती करुन संसदेचं चार दिवसीय विशेष सत्र बोलावण्याची मागणी केली आहे. त्यावर आता भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली जातेय. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी अपरिपक्वतेचं दर्शन घडवल्याचा जोरदार टोला लगावलाय. (Devendra Fadnavis criticizes CM Uddhav Thackeray over letter to Governor Bhagat Singh Koshyari)

‘मुख्यमंत्र्यांचे सल्लागार, अधिकारी अतिशय अपरिपक्व’

‘मुख्यमंत्री कार्यालयात काही अधिकारी किंवा सल्लागार अतिशय अपरिपक्व असल्यामुळे अशाप्रकराचं पत्र गेल्याचं माझा लक्षात येत आहे. मुख्यमंत्र्यांना सल्ला देईल, तो त्यांनी ऐकायचा असेल तर ऐकावा नाही तर ऐकू नये. अशाप्रकारचं पत्र पाठवतानात त्यांनीही खातरजमा केली पाहिजे. मुळातच कुठल्याही पक्षाचं किंवा कुणाचंही डेलिगेशन जेव्हा राज्यापालांना भेटतं, त्यावर राज्यपालांकडून एक पत्र जातं. हे डेलिगेशन मला भेटलं, या त्यांच्या मागण्या आहेत. त्यानुसार आपण कारवाई करावी. आताही जे पत्र त्यांनी दिलं त्यात सांगितलं आहे की, मला 13 आमदारांचं डेलिगेशन भेटलं. त्यांनी शक्ती कायदा लवकर व्हावा अशा प्रकारची मागणी केली आहे. शक्ती कायदा लवकर बनवावा यासाठी दोन दिवसांचं अधिवेशन बोलावण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे आपण त्याचा विचार करावा. हा कुठलाही आदेश नाही, हा विचार व्यक्त केलाय. राज्यपालांना आदेश देण्याचा, फॉरवर्ड करण्याचा अधिकार आहे. त्यांनी तो फॉरवर्ड केलाय’, असं फडणवीस म्हणाले.

‘राजकीय रंग देणं योग्य नाही’

‘मी गेली 25 वर्षे झाली पाहतोय सरकार कुणाचंही असो, राज्यपाल कुणाचेही असो, अशाच प्रकारचं पत्र फॉरवर्ड केलं जातं. मात्र, याठिकाणी मुख्यमंत्री कार्यालयानं अपरिपक्वता दाखवली आहे. 7 दिवस रिसर्च करुन, वेगवेगळ्या राज्यांचे आकडे घेऊन, अशाप्रकारचं पत्र पाठवण्याऐवजी राज्यातील पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले असते आणि शक्ती कायद्यावर लवकर विचार झाला असता तर ते अधिक संवेदनशील दिसलं असतं. पण त्याला अशाप्रकारे राजकीय रंग देणं योग्य नाही. हे अपरिपक्वतेचं परिचायक आहे’, अशा शब्दात फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय.

ठाकरेंनी नितीची तरी साथ सोडू नये – मुनगंटीवार

‘राज्यपालांनी अधिवेशन घ्या असा सल्ला दिल्यानंतर केंद्राकडे बोट दाखवणे म्हणजे असंगाशी संग आहे. राज्यपालांची सूचना शिरोधार्ह मानून त्यावर अंमल करत देशाला मार्ग दाखविण्याची ही वेळ होती. साकीनाका संदर्भात आपण केलेल्या उपाययोजना पाहून, मग देशाला उत्तम काम दाखवून संसदेचे अधिवेशन घ्या, अशी भूमिका मांडता आली असती. साकीनाका प्रकरणी असंवेदनशीलतेनं दुसरीकडे बोट दाखवू नका. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युती तोडून महाविकास आघाडी स्थापन केली. मात्र, त्यांनी आता नीतीची तरी साथ सोडू नये’, अशी खोचक टीका मुनगंटीवार यांनी केलीय.

इतर बातम्या :

‘उलट सुलट आरोपांपेक्षा राज्याच्या विकासाकडे लक्ष द्या’, रामदास आठवलेंचा राऊतांना सल्ला

काँग्रेसकडून राज्यसभेसाठी रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, महाविकास आघाडी नेत्यांना विजयाचा विश्वास

Devendra Fadnavis criticizes CM Uddhav Thackeray over letter to Governor Bhagat Singh Koshyari

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.