आघाडी सरकारविरोधात एल्गार पुकारावाच लागेल, रस्त्यावर उतरावेच लागेल; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

आता महाविकास आघाडी सरकारविरोधात रस्त्यावर उतरून एल्गार पुकारावाच लागेल, असा इशाराही फडणवीसांनी दिलाय. मुंबईत आज भाजपच्या कार्यकारिणीची महत्वाची बैठक पार पडली. त्यावेळी फडणवीस यांच्यासह सर्वच भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

आघाडी सरकारविरोधात एल्गार पुकारावाच लागेल, रस्त्यावर उतरावेच लागेल; देवेंद्र फडणवीसांचा इशारा
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Follow us
| Updated on: Nov 16, 2021 | 5:32 PM

मुंबई : ‘महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्या प्रकारचा अनाचार, दुराचार आणि भ्रष्टाचार पाहायला मिळतोय. त्यावरुन महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारचं नाव नोंद होईल’, असा घणाघात माजी मुख्यमंत्री आणि विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. इतकंच नाही तर आता महाविकास आघाडी सरकारविरोधात रस्त्यावर उतरून एल्गार पुकारावाच लागेल, असा इशाराही फडणवीसांनी दिलाय. मुंबईत आज भाजपच्या कार्यकारिणीची महत्वाची बैठक पार पडली. त्यावेळी फडणवीस यांच्यासह सर्वच भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. (Devendra Fadnavis criticizes Mahavikas Aghadi government from BJP executive meeting)

ठाकरे सरकारच्या काळात हजारो कोटीची लूट सुरू आहे. वाटमारी सुरू आहे. पण सामान्य लोकांकडे पाहायला कुणालाही वेळ नाही. सुधीरभाऊंनी चांगला राजकीय प्रस्ताव मांडला. या सरकारचे कपडे काढले. पण सुधीर भाऊ या सरकारचे कितीही कपडे काढले तरी या निर्लज्जांना काही फार परिणाम होतो असं नाही. त्यामुळे आता आपल्याला या सरकारच्या विरोधात एल्गार पुकारून रस्त्यावर उतरावंच लागेल. आता कोरोना आहे म्हणून हे सरकार आपल्याला थांबवू शकत नाही. दोन वर्ष करोना आहे म्हणून ते आम्हाला रोखत होतो. आमच्यावर गुन्हे दाखल करत होते. पण आता ते चालणार नाही, असा सूचक इशारा फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिलाय.

‘महाराष्ट्राला पूर्वपदावर आणण्यास खूप वेळ लागेल’

केवळ माजी गृहमंत्री जेलमध्ये आहेत. एवढ्यावर हे सिमीत नाही. प्रत्येक विभागात वाझे आहेत. एक एक आकडा बघितला तर मन थक्क होईल. नुकत्याच काही धाडी पडल्या त्यात हजार कोटी, पाचशे कोटी, चारशे कोटीची दलाली उघड झाली. पण सामान्य शेतकऱ्यांकडे मात्र वळून पाहायला कुणी तयार नाही. देशद्रोह्यांसोबत भागिदारी करत आहेत. त्यांच्या जमिनी तुम्ही घेत आहात. आज जिल्ह्या जिल्ह्यात मंत्री, आमदार, खासदारांचं अवैध रेती, अवैध दारूचं नेक्सस सुरु आहे. महाराष्ट्रात यापूर्वी अशी अवस्था कधीही पाहिली नव्हती. पुढे कुणाचंही राज्य आलं तर महाराष्ट्राला पूर्व पदावर आणण्यासाठी खूप काळ लागेल. कोटी कोटी रुपये देऊन पोलीस अधिकारी त्या पदावर येत असतील तर आम्ही त्यांना काय आवाहन करणार की भ्रष्टाचार थांबवा, अशी खंतही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

‘आमच्याकडे इनामी नाही आणि बेनामीही नाही’

आम्हाला कुणालाही घाबरण्याचं काम नाही. आमच्याकडे इनामी नाही आणि बेनामीही नाही.आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. जेव्हा वर्षातून बाहेर पडलो. तेव्हा चार महिने भाड्याच्या घरात राहिलो. स्वतचं घर नव्हतं.त्यामुळे घाबरण्याचं काम नाही. हे भ्रष्टाचारी सरकार आहे. थेट लढाई आहे. त्यामुळे आपण नाही लढलो तर काळ माफ करणार नाही, असा घणाघातही फडणवीस यांनी केलाय.

इतर बातम्या :

अमरावती दंगलीमागे नवाब मलिकांचा हात, हाजी अराफात यांचा गंभीर आरोप, मलिकांनी पैसे पुरवल्याचाही दावा

विलिनीकरणाचा मुद्दा कसा सुटणार? परब म्हणाले, चर्चा हाच एकमेव मार्ग; पडळकर, खोतांच्या भूमिकेवर बोट

Devendra Fadnavis criticizes Mahavikas Aghadi government from BJP executive meeting

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.