Devendra Fadanvis | संजय राऊत यांना विचारतो कोण? त्यांचा वजूद काय? देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा डिवचलं

भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर झालेल्या हल्ल्याला पोलिसांची मदत होती, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Devendra Fadanvis | संजय राऊत यांना विचारतो कोण? त्यांचा वजूद काय? देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा डिवचलं
Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 5:29 PM

मुंबईः संजय राऊत यांना कोण विचारतो, त्यांना ना शिवसेनेत किंमत आहे ना शिवसेनेबाहेर. त्यांचा वजूद काय आहे? राऊत (Sanjay Raut) उद्या अमेरिकेच्या पंतप्रधान यांना घाबरत नाही असं म्हणतील. पण अमेरिकेचे राष्ट्रपती त्यांना हुंगतो का? असा खोचक सवाल भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला आहे. मातोश्रीसमोर हनुमान चालिसाचा (Hanuman Chalisa) आग्रह धरणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी अखेर माघार घेतली. त्यानंतर शिवसैनिकांसमोर राणा दाम्पत्यानं हार मानल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या नेत्यांकडून दिली जात आहे. भाजप काही भंपक लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हल्ला करत होते, अशी टीका संजय राऊत यांनी केली. त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी राऊतांवर खोचक टीका केली.

राणांना राष्ट्रीय नेता बनवण्याचा विडा उचललाय का?

राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा म्हणण्यावर शिवसेनेने एवढा गोंधळ माजवण्याचं कारणच नाही, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते म्हणाले, ‘ हनुमान चालीसा म्हणतोय त्यावर येवढा राडा कशाला ? कुणाच्याही घरावर आंदोलन करायला आमचा विरोध आहे. पण कुणी हनुमान चालीसा म्हणतो म्हणून इतकी माणसं जमा करायची.. कुणी हल्ला करायला जाणार नव्हते.. रवी राणा आणि नवनीत राणा यांना राष्ट्रीय नेता बनवण्याचा बिडा शिवसेनेने उचलला का? ते गेले असते एखाद्या कोपऱ्यात हनुमान चालीसा पठन केला असता. कुणी दखलंही घेतली नसती. कुणाच्या घरावर जाणे, हल्ला करणे… शिवसेनेच्या नेत्यांना असं वाटतंय की सहानुभूती त्यांना मिळेल. त्यांना सहानुभूती मिळणार नाही.

‘कंबोज यांच्या हल्ल्याला पोलिसांची मदत’

भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर झालेल्या हल्ल्याला पोलिसांची मदत होती, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते म्हणाले, ‘ पोलिसांना हाताशी धरुन सगळं चाललंय. काल मोहित कंबोज यांच्यावर पोलीस मदत आहे म्हणून हल्ला झाला. मोहित कंबोज यांच्याकडे तलवार आहे, बंदूक घेऊन होते ॲसीड आहे असं म्हणनं हास्यास्पदच आहे. हल्ल्यानंतर त्यांच्यावर केसेस कशा टाकायच्या याची तयारी त्यांनी केली. पण यांच्या दुर्दवाने सीसीटीव्ही होते तिथे. सर्व सीसीटीव्हीकडे आमचं लक्ष आहे, की ते पुरावे बघून कारवाई करतात, की दबावाला बळी पडतात?

‘राष्ट्रवादीने गृहमंत्रालयाचे बारा वाजवले’

राष्ट्रवादी काँग्रेसने गृहमंत्रालयाचे बारा वाजवलेत अशी टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ गृहमंत्र्यांना चांगलं माहित आहे की राष्ट्रपती शासन कधी लागते.. सहानुभूती मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. जनतेला सर्व माहित आहे. वळसे पाटील यांना कमीपणा वाटला पाहिजे की ते गृहमंत्री असताना गृह मंत्रालयाचे बारा वाजलेत. यांना काही सांभाळता आला नाही, आपलं अपयश झाकण्यासाठी हे भाजपचं नाव घेतात, एवढंच त्यांचं काम आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

इतर बातम्या-

Meghalaya: मेघालय सरकारच्या प्रवेश बंदी विधेयकाला राज्यपाल मलिकांचा ब्रेक; म्हणाले, यावर संमती राष्ट्रपतींची घेणार

अजय देवगणच्या उपस्थितीत मेटावर्समध्ये रनवे 34 गेम लाँच, आता डिजीटल कलेक्टेबलची खरेदी करता येणार

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.