Devendra Fadnavis on Sambhajiraje : ‘संभाजीराजेंची ठरवून कोंडी, पवारांकडून आधी पाठिंबा नंतर घुमजाव’, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि शिवसेनेवर जोरदार टीका केलीय. पवारसाहेबांनी आधी संभाजीराजेंना पाठिंब्याची घोषणा केली नतर घुमजाव केलं. संभाजीराजेंची ठरवून कोंडी करण्यात आल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला आहे.

Devendra Fadnavis on Sambhajiraje : 'संभाजीराजेंची ठरवून कोंडी, पवारांकडून आधी पाठिंबा नंतर घुमजाव', देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
देवेंद्र फडणवीस, संभाजीराजे छत्रपती, शरद पवारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 4:41 PM

मुंबई : संभाजीराजे छत्रपती (Sanbhajiraje Chatrapati) यांनी अखेर राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. शिवसेनेकडून राज्यसभेसाठी दुसरा उमेदवार दिल्या गेल्यानं संभाजीराजे यांची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. अखेर संभाजीराजे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यसभा निवडणुकीतून (Rajya Sabha) माघार घेतल्याची घोषणा केली. इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोपही संभाजीराजे यांनी केलाय. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शरद पवार आणि शिवसेनेवर जोरदार टीका केलीय. पवारसाहेबांनी आधी संभाजीराजेंना पाठिंब्याची घोषणा केली नतर घुमजाव केलं. संभाजीराजेंची ठरवून कोंडी करण्यात आल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संभाजीराजेंना पवारसाहेब पाठिंबा देतो म्हणाले. पवारसाहेबांनी आधी घोषणा केली नंतर घुमजाव गेलं. संभाजीराजेंची ठरवून कोंडी करण्यात आली आहे. ज्यांच्या मदतीची संभाजीराजेंना आशा होती त्यांनी मदत केली नाही, अशा शब्दात फडणवीसांनी पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

संभाजीराजेंची माघार, मुख्यमंत्र्यांवर निशाणा

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेची निवडणूक लढवणार नाही आणि त्यामागची कारणं नेमकी काय आहेत, हे देखील स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला, असं म्हणण्याआधी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक आव्हान दिलं. ‘मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो, कोणतंही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल आपण दोघांनी तिथं जायचं, दोघांनी शिवाजी महाराजांना स्मरण करायचं आणि संभाजी छत्रपती खोटं बोलत असेल तर तुम्ही सांगायचं मग’ असं म्हणत उद्धव ठाकरेंना आव्हानं दिलंय.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांनी भूमिका बदलली?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजे छत्रपती यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा जाहीर केला होता. तसंच शिल्लक राहिलेली मतं त्यांना दिली जातील अशी घोषणाही त्यांनी केली होती. मात्र, शिवसेनेकडून राज्यसभेसाठी दुसरा उमेदवार दिला जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आणि आता पवारांनी आपली भूमिका बदलल्याचं पाहायला मिळत आहे. संभाजीराजे असोत की, आणखी कुणी, राष्ट्रवादी काँग्रेसची शिल्लक राहणारी मतं शिवसेनेच्या उमेदवाराला दिली जातील, अशी घोषणा पवार यांनी केली आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेबाबत संभाजीराजे यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. त्याबाबत पवारांना विचारलं असता ते म्हणाले की, ‘आमच्या पक्षापुरतं सांगतो. आमची एकच जागा आहे. त्यासाठीचा नंबर आमच्याकडे आहे. एक जागा निवडून देऊन आमच्याकडे काही मतं शिल्लक आहेत. दोन वर्षापूर्वी आमच्याकडे एकच जागा येत होती. मुख्यमंत्र्यांना सांगितलं आम्हाला दोन जागा हव्या. मी आणि फौजिया खान. मुख्यमंत्री म्हणाले तुम्ही असाल तर आम्ही देतो. पण पुढच्यावेळी दोन जागा आम्हाला दिल्या पाहिजे. ते आम्ही मान्य केलं. आता आमच्याकडील शिल्लक मते आम्ही शिवसेनेच्या उमेदवाराशिवाय कुणाला देऊ शकत नाही. त्यांनी जे नाव दिलं त्या नावाला आम्ही पाठिंबा देणार. मग ते संभाजीराजे असो की इतर कुणी असो. शिवसेना जो उमेदवार देईल ते त्याला आम्ही मतदान करू. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मतांवर उमेदवार निवडून येईल अशी परिस्थिती आहे, असं शरद पवार यांनी पुण्यात स्पष्ट केलं होतं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.