Devendra Fadnavis : सर्वपक्षीय बैठकीला भाजप नेते का गेले नाहीत? फडणवीस म्हणतात, गृहमंत्र्यांना काही अधिकार आहेत का?

भाजप नेत्यांनी सर्वपक्षीय बैठकीकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. भाजप नेते राज्य सरकारनं बोलावलेल्या बैठकीत का सहभागी झाले नाहीत? याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केलीय.

Devendra Fadnavis : सर्वपक्षीय बैठकीला भाजप नेते का गेले नाहीत? फडणवीस म्हणतात, गृहमंत्र्यांना काही अधिकार आहेत का?
दिलीप वळसे पाटील, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीसImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 4:50 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतलीय. मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला (MahaVikas Aghadi) 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. इतकंच नाही तर सरकारने मशिदींवरील भोंगे हटवले नाहीत तर त्यासमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावण्याचे आदेशच राज यांनी मनसैनिकांना दिलेत. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत मनसे नेते बाळा नांदगावकरही सहभागी झाले. मात्र, भाजप नेत्यांनी सर्वपक्षीय बैठकीकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. भाजप नेते राज्य सरकारनं बोलावलेल्या बैठकीत का सहभागी झाले नाहीत? याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केलीय.

भाजपची सर्वपक्षीय बैठकीकडे पाठ का?

मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारनं बोलावलेल्या बैठकीत भाजप नेते सहभागी झाले नसल्याबाबत पत्रकारांनी फडणवीसांना प्रश्न विचारला. त्यावेळी बोलताना फडणवीसांनी भाजपची भूमिका स्पष्ट केलीय. ठाकरे सरकार जर हिटलरी प्रवृत्तीनं वागत असेल, त्यांना हवं तेच करत असेल तर त्या बैठकीला उपस्थित राहून काय उपयोग होणार? असा सवाल फडणवीस यांनी केलाय. तसंच अशा सरकारसोबत संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा, असंही फडणीस म्हणाले.

फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला

फडणवीस नेमकं काय म्हणाले?

ज्या प्रकारे किरीट सोमय्यांवर हल्ला झाला. पोलिसांसमोर झेड दर्जाची सुरक्षा असलेल्या व्यक्तीला कवळल्यानंतरही मारलं जातं. मोहित कंबोज यांच्याबाबत तर मॉब लिंचिंगचा प्रयत्न झाला. हे केवळ मुंबईतच नाही तर राज्यभरात भाजप नेत्यांना टार्गेट करुन त्यांच्यावर केस टाकल्या जात आहेत. मग कधी प्रवीण दरेकरांवर केस दाखल केली जाते. हाटकोर्टाचे आभार मानेल की बोगस केस होती, त्यांनी रिलिफ दिला. तर त्यावर हायकोर्टावर आरोप केला जातो. इतक्या खालच्या स्तराला ही नेते मंडळी पोहोचली आहेत. तिकडे आमचे रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील. त्यांच्याविरोधात 8 खोट्या तक्रारी त्यांच्याविरोधात केल्या. जयकुमार गोरे, एक यादीच आहे. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा दुरुपयोग सुरु आहे. हा दुरुपयोगच आहे कारण यांची एकही केस टिकली नाही आणि टिकूही शकत नाही. कारण धादांत खोट्या केसेस टाकणं चाललंय. गृहमंत्र्यांच्या बैठकीला जाऊन फायदा तरी काय? या गृहमंत्र्यांना काही अधिकार तरी आहेत का? जे काही मुंबईत सुरु आहे ते मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर सुरु आहे. त्यामुळे ज्या बैठकीला मुख्यमंत्रीच उपस्थित नाहीत, त्या बैठकीला गृहमंत्री आम्हाला बोलावून काय करणार आहेत? आणि कोणता निर्णय घेणार आहेत? इतक्या मोठ्या बैठकीला मुख्यमंत्रीच राहत नाहीत, तर ही बैठक म्हणजे निव्वळ टाईमपास आहे का? असा खोचक सवाल फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केलाय.

इतर बातम्या :

MNS Loudspeaker Meet : सरकार भोंग्यावर ठाम, सर्वपक्षीय बैठकीनंतर मनसेही भूमिकेवर ठाम, नांदगावकर म्हणतात, 3 मेचं अल्टीमेटम कायम

Loudspeaker Meeting: सकाळी 6 ते रात्री 10 अजानचा भोंगा बंद करता येणार नाही तर मग पर्याय काय? वळसे पाटलांनी ‘केंद्रीय मार्ग’ सांगितला

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.