Maharashtra Cabinet Expansion : भाजपच्या संभाव्य 9 मंत्र्यांसोबत देवेंद्र फडणवीसांचं स्नेहभोजन, भाजपकडून कुणाची मंत्रीपदी वर्णी? वाचा संपूर्ण यादी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना स्नेहभोजनाचं निमंत्रण देण्यात आल्याची माहिती मिळतेय. आज रात्री हे स्नेहभोजन आयोजित करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

Maharashtra Cabinet Expansion : भाजपच्या संभाव्य 9 मंत्र्यांसोबत देवेंद्र फडणवीसांचं स्नेहभोजन, भाजपकडून कुणाची मंत्रीपदी वर्णी? वाचा संपूर्ण यादी
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 8:07 PM

मुंबई : शिंदे आणि फडणवीस सरकारचा (Shinde Fadnavis Government) महिनाभरापासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त लागलाय. मंगळवार, 8 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होणार आहे. भाजप आणि शिंदे गटातील प्रत्येकी 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. या आमदारांना पक्षश्रेष्ठींकडून सकाळीपासून फोन गेले आहेत आणि त्यांना तातडीने मुंबईत पोहोचण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. अशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना स्नेहभोजनाचं निमंत्रण देण्यात आल्याची माहिती मिळतेय. आज रात्री हे स्नेहभोजन आयोजित करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

भाजपकडून कुणाकुणाला फोन गेले किंवा कुणाची मंत्रिपदी वर्णी लागणार याची काही नावंही समोर आली आहेत. त्यात चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, सुरेश खाडे, विजय गावित, अतुल सावे, गणेश नाईक आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा समावेश आहे. या संभाव्य मंत्र्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलं असल्याची माहिती मिळत आहे.

भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलार?

चंद्रकांत पाटील यांना मंत्रिपद दिल्यास, प्रदेशाध्यक्षपद दुसऱ्याकडे दिलं जाऊ शकतं, अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात सुरु होती. अशावेळी मुंबई महापालिका निवडणूक आणि आशिष शेलार यांचं संघटन कौशल्य लक्षात घेत पक्षश्रेष्ठींनी भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी शेलार यांच्याकडे देण्याचं निश्चित केल्याचं सांगितलं जात आहे. आता पाटील यांचं नाव मंत्रिपदासाठी नक्की झाल्यामुळे शेलारांकडे भाजप प्रदेशाध्यक्षपद दिलं जाईल, अशी चर्चा भाजपच्या गोटात सुरु आहे.

शिंदे गटातील कुणाची मंत्रिपदी वर्णी?

शिंदे गटातील 9 आमदार उद्या मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. हाती आलेल्या माहितीनुसार आमदार गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, दादा भुसे, संजय शिरसाट आणि उदय सामंत यांना फोन गेले आहेत. त्यांना मुंबईत पोहोचण्याचे आदेश शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे या आमदारांना मंत्रिपद मिळणार हे निश्चित मानलं जात आहे.

रात्री किंवा उद्यापर्यंत नावं निश्चित होणार- मुख्यमंत्री

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दुपारी मुंबईहून नांदेड दौऱ्यासाठी रवाना झाले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल. मंत्रिपदाची नावं अद्याप निश्चित झाली नाहीत. आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत नावं नक्की होतील, अशी माहिती शिंदे यांनी दिली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.