फडणवीसांचे मोठे बंधू राज ठाकरेंना भेटले, पहा काय झालं चर्चेत?

फडणवीसांचे मोठे बंधू राज ठाकरेंना भेटले, पहा काय झालं चर्चेत?

| Updated on: Sep 19, 2022 | 4:38 PM

राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची भेट घ्यायची होती. पण दोन राजकीय पक्षांतील कुटुंबियांनी भेट घेतल्यानंतर अशी चर्चा होणारच, असं आशिष फडणवीस यांनी स्पष्ट केलं. 

नागपूरः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मनसे (MNS) आणि भाजपची (BJP) छुपी युती होण्याच्या चर्चांना सध्या राजकारणात उधाण आलंय. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे मोठे बंधू आशिष फडणवीस (Aashish Fadanvis) यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीत नेमकं काय झालं, याविषयी टीव्ही 9 ने त्यांच्याशी बातचित केली. मात्र या भेटीत राजकीय संदर्भ नसल्याचं आशिष फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मी राजकारणाशी संबंधित नाही, पण राज ठाकरेंचे वैयक्तिक संबंध आहेत. अनेक दिवसांपासून त्यांची भेट झाली नव्हती, म्हणून मी ही भेट घेतल्याचं आशिष यांनी सांगितलं. राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची भेट घ्यायची होती. पण दोन राजकीय पक्षांतील कुटुंबियांनी भेट घेतल्यानंतर अशी चर्चा होणारच, असंही आशिष फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

Published on: Sep 19, 2022 04:38 PM