Devendra Fadnavis : ‘तो’ पुन्हा आला, अंगी असलेल्या या 5 गुणांमुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा आले

Devendra Fadnavis : महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र पर्व सुरु होणार आहे. 2019 साली त्यांनी नारा दिला, 'मी पुन्हा येईन' त्यावेळी त्यांची खिल्ली उडवली. पण प्रचंड मेहनत, आत्मविश्वास आणि सगळ्यांना जिंकून तो पुन्हा येतोय. महाराष्ट्रासारख्या राज्यात पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवणं सोप नाहीय, पण कुठल्या पाच गुणांमुळे त्यांना हे शक्य झालं, त्याबद्दल....

Devendra Fadnavis : 'तो' पुन्हा आला, अंगी असलेल्या या 5 गुणांमुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा आले
Devendra Fadnavis
Follow us
| Updated on: Dec 04, 2024 | 12:10 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा देवेंद्र पर्व सुरु होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. आज भाजपची गटनेता निवडीची बैठक झाली. यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि विजय रुपाणी केंद्रीय निरीक्षक म्हणून महाराष्ट्रात आले होते. भाजपच्या निवडून आलेल्या सर्व 132 आमदारांनी एकमताने मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांची निवड केली. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग सोपा नव्हता. अनेक राजकीय अडथळे, आव्हान समोर होती. पण या सगळ्यावर मात करुन देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. महत्त्वाच म्हणजे त्यांनी सर्वांना सोबत घेऊन हे यश मिळवलं. देवेंद्र फडणवीस यांनी 2019 सालच्या विधानसभ निवडणुकीत ‘मी पुन्हा येईन’ अशी घोषणा केली होती. त्यावेळी या घोषणेवरुन त्यांना उलटं टार्गेट करण्यात आलं. पण आज या सगळ्या आव्हानांवर मात करुन ते पुन्हा आले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी पुन्हा येणं अजिबात सोप नव्हतं. ते पुन्हा आले ते त्यांच्या अंगी असलेल्या या पाच गुणांमुळे

1) देवेंद्र फडणवीस हे प्रचंड अभ्यासू नेते आहेत. त्यांचा मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास नगरसेवक पदापासून सुरु झाला. त्यांनी आधी नगरसेवक पदाची निवडणूक जिंकली. त्यानंतर नागपूरचे सर्वात तरुण महापौर बनले. त्यांचा अभ्यासू स्वभाव, विषय समजून घेण्याची हातोटी यामुळेच भाजपने त्यांना आमदारकीची संधी दिली. देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्वाच कौशल्य म्हणजे मुद्देसूद मांडणी. कुठल्याही विषयाचा व्यवस्थित अभ्यास करुन मुद्देसूद मांडणी करुन ते बोलतात. त्यामुळे समोरच्यावर त्यांच्या बोलण्याची छाप उमटते.

2) देवेंद्र फडणवीस यांचा आणखी एक गुण म्हणजे ट्रोलिंग सहन करण्याची क्षमता. त्यांच्यावर फक्त विरोधकच टीका करतात असं नाही, तर सोशल मीडियावर भाजप विरोधी त्यांच्यावर सतत शाब्दीक हल्ला चढवत असतात. त्यांना नको-नको ते बोलतात. पण देवेंद्र फडणवीस यांनी अन्य नेत्यांसारख त्यावरुन कधीही आरडाओरड, आदळआपट केली नाही. त्यांनी ज्या टीकेला उत्तर देणं गरजेच आहे, त्या टीकेलाच उत्तर दिलं. महत्त्वाच म्हणजे टीका होते, टेन्शन असतं, राजकीय आव्हान असतात. तरी ती चिंता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाहीत.

3) देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अनेक आव्हान होती. पण त्या सगळ्यांना ते पुरुन उरले. 2024 च्या निवडणुकीतील विजयानंतर मुख्यमंत्री पदावर त्यांचाच अधिकार आहे. कारण 2014 साली ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, त्यावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सत्तेत होती. पण बाहेर विरोधी पक्षाची भूमिका बजावायची. कारण काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा त्यावेळी शिवसेनेने प्रखर विरोधी पक्षाची भूमिका बजावली. 2019 च्या निकालानंतर शिवसेनेने त्यांच्या मनात काय होतं, ते दाखवून दिलं. त्यामुळे फडणवीसांना मुख्यमंत्री बनता आलं नाही. सहा महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा महाराष्ट्रात दारुण पराभव झालेला. देवेंद्र फडणवीस यांनी चांगल्या टीम लीडरप्रमाणे जबाबदारी स्वीकारून पायउतार होण्याची तयारी सुद्धा दाखवली. पण पक्षाने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. आज निकाल आपल्या सर्वांसमोर आहे.

4) आज महाराष्ट्र भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा बोलबोला आहे. त्यांच्या तोडीचा एकही नेता नाहीय. त्यांना एकवेळ स्पर्धक असणारे नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे आज शर्यतीत नाहीत. हे सुद्धा त्यांच्या राजकीय कौशल्याच यश आहे.

5) इन्फ्रास्ट्रक्चर मॅन ही सुद्धा देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे. त्यांनी त्यांच्या साडेसात वर्षाच्या सत्ता काळात पायाभूत सोयी-सुविधाचे अनेक प्रकल्प मार्गी लावले. महत्त्वाच म्हणजे सुरु केलेले प्रकल्प त्यांच्या कार्यकाळातच पूर्ण झाले. उदहारणार्थ मेट्रो, कोस्टल रोड, अटल रोड. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.