AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘देवेंद्र फडणवीस यांनी एकच बॉम्ब फोडला, असे अनेक शस्त्र पुढे बाहेर निघतील’, चंद्रशेखर बावनकुळेंचा सरकारला इशारा

भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्यांची चोकशी करायची सोडून राज्य सरकारने आमचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाच नोटीस पाठवली, हे कृत्य चुकीचे आहे. पोलिसांनी तात्काळ नोटीस परत घ्यावी. देवेंद्र फडणवीस यांनी एकच बॉम्ब फोडला असून, त्यांच्याकडे असे अनेक शस्त्र आहेत. येणाऱ्या काळात ते बाहेर निघतील, असा दावाही बावनकुळे यांनी केलाय.

'देवेंद्र फडणवीस यांनी एकच बॉम्ब फोडला, असे अनेक शस्त्र पुढे बाहेर निघतील', चंद्रशेखर बावनकुळेंचा सरकारला इशारा
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये भाजपचं आंदोलनImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 4:27 PM

नागपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा जवाब आज पोलिसांनी त्यांच्या सागर बंगल्यावर नोंदवला. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अशावेळी माजी ऊर्जामंत्री आणि भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी तर महाविकास आघाडीला थेट इशाराच देऊन टाकलाय. ‘महाराष्ट्र अशांत करण्याचा महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचा घाट आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्यांची चोकशी करायची सोडून राज्य सरकारने आमचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाच नोटीस पाठवली, हे कृत्य चुकीचे आहे. पोलिसांनी तात्काळ नोटीस परत घ्यावी. देवेंद्र फडणवीस यांनी एकच बॉम्ब फोडला असून, त्यांच्याकडे असे अनेक शस्त्र आहेत. येणाऱ्या काळात ते बाहेर निघतील, असा दावाही बावनकुळे यांनी केलाय.

फडणवीसांना पाठवलेल्या नोटीशीचा नागपुरात निषेध

पोलिसांच्या बदली संदर्भातला अहवाल लिक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांना चौकशीची नोटीस पाठवली. त्याच नोटिशीचा निषेध करण्यासाठी रविवारी नागपुरातील हजारो भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात यावेळी नोटिशीची होळी करण्यात आली. या आंदोलनाला प्रामुख्याने खासदार विकास महात्मे, माजी मंत्री अनिल बोंडे, भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण दटके, नागपूर ग्रामीण अध्यक्ष अरविंद गजभिये, आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार सुधीर पारवे, माजी आमदार गिरीश व्यास, प्रदेश सदस्य डॉ. राजीव पोतदार, महामंत्री अविनाश खळतकर, शहर भाजपा युमोचे अध्यक्ष पारेन्द्र पटले, ग्रामीण भाजपा युमोचे अध्यक्ष आदर्श पटले, विशाल भोसले, संजय फांजे उपस्थित होते.

‘दबाव तंत्राने भाजपाचे कार्यकर्ते शांत बसणार नाहीत’

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी उघड केलेल्या पोलीस बदल्यांच्या घोटाळ्याचा राज्य सरकारने तपास करावा. माहितीचा स्रोत विचारण्यापेक्षा ती खरी की खोटी याची चौकशी करावी आणि दोषी मंत्र्यांवर कारवाई करावी. नोटीस पाठवून देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज्य सरकारने दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये. हे चुकीचे आहे. अशा दबाव तंत्राने भाजपाचे कार्यकर्ते शांत बसणार नाहीत. आम्ही महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेपर्यंत पोहोचून राज्य सरकारचा भ्रष्टाचारी चेहरा उघड करू.

‘फडणवीसांना घटनात्मक अधिकार’

विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सरकार मधील भ्रष्टाचार आणि नियमबाह्य गोष्टी बाहेर आणण्याचा घटनात्मक अधिकार आहे. त्याच अधिकारान्वये देवेंद्र फडणवीस माहिती विधिमंडळात आणि जनतेसमोर मांडत असल्याचे बावनकुळे म्हणाले.

इतर बातम्या :

मला आरोपी, सहआरोपी बनवलं जाईल असे सवाल केले, देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा

Video – Akola | प्रकाश आंबेडकरांनी घेतला देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार, सामान्य माणसाच्या भाषेत आक्षेपार्ह विधान

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.