‘नो वन किल्ड जेसिका’ सारखी पूजा चव्हाण प्रकरणाची गत होईल, राज्य सरकारच्या भूमिकेवर फडणवीसांकडून प्रश्नचिन्ह

नो वन किल्ड जेसिका या चित्रपटासारखी या प्रकरणाची अवस्था होईल, असं धक्कादायक विधान करत फडणवीसांनी राज्य सरकारच्या भूमिकेवरच बोट ठेवलं आहे.

'नो वन किल्ड जेसिका' सारखी पूजा चव्हाण प्रकरणाची गत होईल, राज्य सरकारच्या भूमिकेवर फडणवीसांकडून प्रश्नचिन्ह
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 5:12 PM

मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणात आता विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून राज्य सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. राज्य सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. इतकच नाही तर नो वन किल्ड जेसिका या चित्रपटासारखी या प्रकरणाची अवस्था होईल, असं धक्कादायक विधान करत फडणवीसांनी राज्य सरकारच्या भूमिकेवरच बोट ठेवलं आहे.(Devendra Fadnavis makes serious allegations against Pooja Chavan case)

पूजा चव्हाण प्रकरणात फार काही कारवाई होईल असं वाटत नाही. नो वन किल्ड जेसिका या सिनेमासारखी या प्रकरणाची गत होईल. हे सगळं ठाकरे सरकारच्या आशीर्वादाने सुरु आहे. हे प्रकरण दाबण्याचा सरकार यशस्वी प्रयत्न करत असल्याचं दिसतंय, असा घणाघाती आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. तर संजय राठोड सध्या कुठे आहेत ते कुणाला माहिती नाही. पोलीस महासंचालक प्रेस रिलीज काढत नाहीत. सरकार एरवी ट्वीट करतं पण आता का करत नाही? बेपत्ता झालेला मंत्री कॅबिनेटमध्ये येत नाही, सरकारी निवासस्थानामध्ये नाही, यवतमाळमध्येही नाही. सरकार जाणिवपूर्वक हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप बावनकुळेंनी केलाय.

अहवाल सादर, अद्याप कोणालाही अटक नाही

पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात काही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या. या रेकॉर्डिंगमधील आवाज हा संजय राठोड यांचाच आहे, असा दावा भाजपने केलेला आहे. त्यामुळे पूजाच्या आत्महत्या प्रकरणात निष्षक्ष चौकशी करुन राठोड यांची हकालपट्टी करा, अशी मागणी भाजपने लावून धरलेली आहे. भाजप नेते चित्रा वाघ, भाजप नेते अतुल भातखळकर या नेत्यांनी महाविकास आघाडीचे सरकार आणि पोलिसांना थेट लक्ष्य करत, राठोड यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला होता. तसेच, पोलीस या प्रकरणी निष्पक्षपणे तपास करत नसल्याचेही भाजपने म्हटले होते.

या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी एक अहवाल सादर केला आहे. अहवालाच्या प्रति राज्याचे पोलीस महासंचलक तसेच राष्ट्रीय महिला आयोगाला पाठवण्यात आल्या आहेत. मात्र, असे असले तरी या प्रकरणात अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेलं नसल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलं आहे.

राज्यात तीन पथकांकडून तपास

दरम्यान, या प्रकरणात पोलीस निष्पक्षपणे तपास करत नसल्याचा आरोप विरोधकांकडून होत असला तरी, राज्यात एकूण तीन पथकांकडून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात तपास सुरु आहे. ही तिन्ही पथकं राज्यातल्या वेगवेगळ्या भागात तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

Pooja Chavan Suicide Case Live Updates : कोणावरही अन्याय होणार नाही, सत्य बाहेर येईल : मुख्यमंत्री

कोण आहे अरुण राठोड? जो सातत्यानं पूजा आणि मंत्र्यांच्या संपर्कात होता?

Devendra Fadnavis makes serious allegations against Pooja Chavan case

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.