AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादा हे तुमच्याबद्दल आहे, फडणवीसांचा सभागृहात पेनड्राईव्ह बॉंब, अजित पवार काय बोलणार?

रकारकडून विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र आखलं जात असल्याचा दावा करत, फडणवीस यांनी विशेष सरकारी वकील प्रविण पंडित चव्हाण यांचे अनेक व्हिडीओ असल्याचा एक पेनड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना दिलाय. तसंच आपल्याकडे तब्बल सव्वाशे तासांचं रेकॉर्डिंग असल्याचा दावाही फडणवीस यांनी केलाय. यावेळी फडणवीस यांनी अजित पवारांबाबतचा एक व्हिडीओही सादर केलाय. फडणवीसांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.

अजितदादा हे तुमच्याबद्दल आहे, फडणवीसांचा सभागृहात पेनड्राईव्ह बॉंब, अजित पवार काय बोलणार?
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेतेImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 7:23 PM

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) काळातील आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केलाय. राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor) यांच्यावर फडणवीसांनी गंभीर आरोप केलाय. सरकारकडून विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र आखलं जात असल्याचा दावा करत, फडणवीस यांनी विशेष सरकारी वकील प्रविण पंडित चव्हाण यांचे अनेक व्हिडीओ असल्याचा एक पेनड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना दिलाय. तसंच आपल्याकडे तब्बल सव्वाशे तासांचं रेकॉर्डिंग असल्याचा दावाही फडणवीस यांनी केलाय. यावेळी फडणवीस यांनी अजित पवारांबाबतचा एक व्हिडीओही सादर केलाय. फडणवीसांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.

विधानसभेत बोलताना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राची पोलीस व्यवस्था ही अतिशय प्रगल्भ आहे. मी पाच वर्षे गृहमंत्री म्हणूनही काम केलं आहे. महाराष्ट्र पोलिसांचा मला अभिमान आहे. देशात कायद्यानं, नियमानं काम करणारं पोलीस दल अशी आपल्या पोलीस दलाची ख्याती आहे. पण अलीकडे या पोलीस दलाचा गैरवापर सत्ताधाऱ्यांकडून वाढलाय. आपल्या विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र सरकारकडून होत असेल तर ज्या उद्देशानं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाही दिली, त्याचा उद्देश कधीही साध्य होणार नाही, अशी खंत फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलीय.

फडणवीसांनी अध्यक्षांना पेन-ड्राईव्ह दिला

देवेंद्र फडणवीस यांनी एक पेन ड्राईव्ह अध्यक्षांना दिला. कशाप्रकारची कट कारस्थानं सरकार शिजवतयं त्याची उदाहरणं आणि पुरावे मी या पेन ड्राईव्हमध्ये दिले आहेत, असं फडणवीसांनी सांगितलं. गिरीश महाजनांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल झाला. 2021 मध्ये असा गुन्हा दाखल केला की 2018 मध्ये मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या एका वादाबाबत भोईटे गटाच्या वतीनं महाजनांची स्वीय सहायक रामेश्वर यांनी पाटील गटाच्या एकाचं अपहरण केलं. मग गिरीश महाजनांचा फोन आला त्यांनी धमकी दिली. त्या आधारावर त्याला सांगण्यात आलं की तू त्या विद्या प्रसारक मंडळाचा राजीनामा दे. त्यावर आम्हाला यायचं आहे. अशाप्रकारची अत्यंत बनावट केस तयार केली. त्या पलिकडे जाऊन गिरीश महाजनांचा मकोका लागला पाहिजे म्हणून तशी कागदपत्र गोळा केली गेली. पण महाजनांना कोर्टाकडून दिलासा मिळाल्याचं फडणवीस म्हणाले.

‘आपल्याकडे सव्वाशे तासांचं रेकॉर्डिंग’

मला एक अत्यंत सुरस आणि चमत्कारिक कथा मांडायची आहे. ही कथा एका अशा कत्तलखान्याची आहे, त्यात विरोधकांची कत्तल कशी करायची यासंदर्भातील षडयंत्र शिजत आहे. यातील प्रमुख पात्र आहेत प्रवीण पंडित चव्हाण. सुरेश जैन, रमेश कदम, महेश मोतेवार, डीएसके अशा सगळ्या केसेसमध्ये सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण. कथा खूप मोठी आहे पण मला ती थोडक्यात मांडायची आहे. कथा इतकी सुरस आणि इतकी मोठी आहे की यावर किमान 25 ते 30 वेबसीरिज तयार होतील. पण सगळ्यात महत्वाचं हे कथानक सत्य घटनेवर आधारित आहे. यात मी जे सांगतोय त्या प्रत्येक गोष्टीचा व्हिडीओ मी माननीय अध्यक्षांकडे दिलाय आणि मंत्रिमहोदय आपल्याकडेही देतोय, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्वाच्या गोष्टी लिहित स्वरुपात सदनात दिल्या आणि वाचूनही दाखवल्या. आपल्याकडे याबाबत सव्वाशे तासांचं रेकॉर्डिंग आपल्याकडे असल्याचा दावाही फडणवीसांनी यावेळी केलाय.

‘त्या’ व्हिडीओमध्ये अजित पवारांबाबत काय?

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विशेष सरकारी वकिलांचा अजित पवारांबाबतच्या एका व्हिडीओतील संवाद सांगितलाय. ‘अजित पवार सपोर्ट करत नाहीत. पण बडे साहब सब देख रहे हैं. कुणी चांगले अधिकारी आहेत का, चार पाच अधिकाऱ्यांची चांगली नावं द्या, असं मला सांगितलं आहे. त्यांनाच आपण अपॉइंट करु आणि त्या माध्यमातून सर्व कारवाई आपण करु’, असं विशेष सरकारी वकील या व्हिडीओ सांगत असल्याचा दावा फडणवीस यांनी विधानसभेत केलाय. इतकंच नाही तर असे अनेक व्हिडीओ या पेनड्राईव्हमध्ये असल्याचं सांगत फडणवीस यांनी अनेक महत्वाच्या व्हिडीओमधील संवाद वाचून दाखवत मोठी खळबळ उडवून दिलीय.

इतर बातम्या :

गिरीश महाजन, नाथाभाऊ आणि सरकारी वकील, फडणवीसांकडून पेनड्राईव्ह सादर, षडयंत्रांचा शब्द ना शब्द सभागृहात मांडला

Sanjay Raut PC : ‘कितीही ताकद लावा, कितीही बदनामी करा, आमच्या केसालाही धक्का लावू शकणार नाहीत’, राऊतांचं थेट आव्हान

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.