चंद्रकांत पाटील यांच्या भीक मागणाच्या ‘त्या’ विधानाचे विधिमंडळात पडसाद, देवेंद्र फडणवीसांचं समर्थन? म्हणाले…

देवेंद्र फडणवीसांनी प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकाचा दाखला,चंद्रकांत पाटलांच्या विधानावर म्हणाले...

चंद्रकांत पाटील यांच्या भीक मागणाच्या 'त्या' विधानाचे विधिमंडळात पडसाद, देवेंद्र फडणवीसांचं समर्थन? म्हणाले...
Follow us
| Updated on: Dec 21, 2022 | 2:13 PM

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधिमंडळात बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर भाष्य केलंय. यावेळी बोलताना त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकाचा संदर्भ दिलाय. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचं मी समर्थन करत नाही, असं फडणवीस म्हणाले. शिवाय प्रबोधनकार ठाकरे (Prabodhankar Thackeray) यांच्या पुस्तकाचाही दाखला त्यांनी दिलाय.

विधिमंडळात देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर बोलताना प्रबोधनकार ठाकरे यांच्या माझी जीवनगाथा पुस्तकाचा संदर्भ दिला. त्यातील काही मजकूरही वाचून दाखवला. भीक मागणे याचा अर्थ काय? हे या पुस्तकाचा संदर्भ देत त्यांनी समजावून सांगितलं.

पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सदर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनीही शाळा सुरु केल्या. मात्र शाळा सुरु करताना सरकारने त्यांना अनुदान दिलं नाही. तर त्यांनी लोकांकडे भीक मागितली, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं.

चंद्रकांत पाटील यांच्या या विधानानंतर विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. चंद्रकांत पाटील यांच्या माफीची मागणी झाली. विरोधकांनी चंद्रकांत पाटलांना घेरलं.

महापुरुषांनी भीक मागितल्याचं वक्तव्य करणं चुकीचं आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटलांविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

चंद्रकांत पाटील यांच्या या विधानाचा कडाडून विरोध झाला.पिंपरीत त्यांच्यावर शाईफेकही झाली.

“महापुरुषांच्या महान कार्याविषयी मला मनापासून आदर आहे. त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाले, यात मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता”, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी माफीही मागितली. या प्रकरणाचे आज विधिमंडळात पडसाद उमटले.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.