पडळकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आषाढी पूजेला येऊ नये, आता फडणवीस म्हणतात….
भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीची महापूजा करु नये, अशी मागणी केली आहे (Devendra Fadnavis on CM Pandharpur Ashadhi Ekadashi Mahapooja).
सोलापूर : भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीची महापूजा करु नये, अशी मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारलं असता, “मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीला पूजेसाठी यायचं असेल तर त्यांना येऊ दिलं पाहिजे”, असं मत मांडलं (Devendra Fadnavis on CM Pandharpur Ashadhi Ekadashi Mahapooja).
“मुख्यमंत्र्यांना पूजेसाठी यायचं असेल तर त्यांना येऊ दिलं पाहिजे. विठ्ठल आमचं आराध्य दैवत आहे. आम्ही त्यांना संपूर्ण आध्यात्मचा राजा म्हणतो. मुख्यमंत्री प्रशासनाचे प्रमुख असतात. त्यामुळे हा मुख्यमंत्र्याचा मान नाही, तर हे मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे की, आमच्या राजाची त्यांनी पूजा केली पाहिजे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis on CM Pandharpur Ashadhi Ekadashi Mahapooja).
हेही वाचा : उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीची महापूजा करु नये : गोपीचंद पडळकर
“मुख्यमंत्र्यांनी पूजा पहिली करावी की दुसरी करावी त्याबाबच काही विवाद असू शकतात. सामान्य मानसाला विठोबाच्या पूजेचा पहिला अधिकार दिला तरी काही हरकत नाही. तसा अधिकार जरुर देता येईल. फक्त मुख्यमंत्र्यांनी पूजेसाठी पंढरपूरला येऊ नये, ही भूमिका योग्य नाही. मुख्यमंत्र्यांची इच्छा असेल तर त्यांनी पंढरपूरला यावं. पहिली पूजा कोणी करावी ते सर्वांनी मिळून ठरवावं”, असंदेखील फडणवीस म्हणाले.
“या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे. मुख्यमंत्री शेवटी जबाबदार नागरीक असतात. जबाबदार माणूस परिस्थिती पाहून निर्णय घेत असतो. कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात पूजा करण्यासाठी येऊ नये, अशी भूमिका घेणं योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी जी काही परिस्थिती असेल त्या संदर्भात आढावा घ्यावा. पण कुणी मध्ये येऊ नये”, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?
पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीला शासकीय महापूजा करण्याचा मान दरवर्षी मुख्यमंत्र्यांना सपत्नीक देण्याची परंपरा आहे. मात्र, सध्या कोरोना संसर्ग असल्याने पंढरपुरात बाहेरील व्यक्ती, महाराज मंडळींना प्रवेश नसेल, तर यंदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीची महापूजा करु नये, असं गोपीचंद पडळकर म्हणाले. सामान्य शेतकरी, वारकरी कुटुंबाला विठ्ठल-रखुमाईच्या महापूजेचा मान द्यावा, असंदेखील ते म्हणाले.
संबंधित बातम्या :
शरद पवार हे राजकीय विरोधक, ते शत्रू नाहीत, पडळकरांच्या टीकेवर फडणवीसांचं भाष्य
Gopichand Padalkar | मी, तटकरे, धनंजय बहुजनच, पडळकरांनी राज्यात फिरुन दाखवावं : जितेंद्र आव्हाड
मिटकरी ते विद्या चव्हाण, पडळकरांवर बरसले, राष्ट्रवादीची आंदोलनाची हाक
Gopichand Padalkar | शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना : गोपीचंद पडळकर