Video : देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल फेकल्याची घटना, पिंपरीत भाजप राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात येणार आहे.

Video : देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल फेकल्याची घटना, पिंपरीत भाजप राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने
देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल भिरकावलीImage Credit source: TV9 Marathi You Tube
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 6:43 PM

पुणे : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमापूर्वी भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आमने सामने आले होते. पोलिसांनी यावेळी लाठीमार देखील केला होता. भाजप आणि  राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांचा ताफा तिथं आला असता एका अज्ञात व्यक्तीनं या गोंधळात देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल भिरकावली. पिंपरी चिंचवड पोलिसांनी या व्यक्तीचा शोध सुरु केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीच्या दिशेन चप्पल भिरकवल्याची घटना घडल्यानं पिंपरीमध्ये खळबळ उडाली आहे. हा मुद्दा जास्त तापण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

पाहा व्हिडीओ:

नेमकं काय घडलं?

पिंपरी चिंचवडमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल भिरकवण्यात आल्याची घटना घडली. उद्यान उद्घाटनाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध होता. याचदरम्यान भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. या दरम्यान जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा ताफा दाखल झाला त्या गोंधळात एका अज्ञात व्यक्तीनं चप्पल फेकली. भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानंतर पोलिसांनी लाठीमार देखील केला होता. गेल्या पाच वर्षात पिंपरी चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा दावा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला होता. ते यासंबंधी निवेदन देवेंद्र फडणवीस यांना देणार होते. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि वादाला सुरुवात झाली.

पिंपरी चिंचवड पोलिसांकडून शोध सुरु

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल फेकल्याची घटना घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी यासंबंधी अज्ञात व्यक्तीचा शोध सुरु केला आहे. पोलीस या प्रकरणी नेमकी कोणती कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे.

भाजप मुद्दा विधिमंडळात मांडणार?

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोंधळात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल फेकण्यात आल्याची घटना घडलीय. सध्या सुरु असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप हा मुद्दा मांडणार का हे पाहावं लागणार आहे.

इतर बातम्या:

दोन पवारांच्या निशाण्यावर राज्यपाल, अजित पवार, शरद पवार आज काय म्हणाले?

Pune Metro : …अशी साकार झाली पुणे मेट्रो ! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उलगडा प्रवास

...म्हणून मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा, त्या क्लिपवरून दमानिया संताप
...म्हणून मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा, त्या क्लिपवरून दमानिया संताप.
सिद्धिविनायकाला जाताय? आता असा ड्रेस कोड असेल तरच मिळणार बाप्पाच दर्शन
सिद्धिविनायकाला जाताय? आता असा ड्रेस कोड असेल तरच मिळणार बाप्पाच दर्शन.
मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर मुंडे स्पष्टच म्हणाले, '...ही माझी इच्छा'
मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर मुंडे स्पष्टच म्हणाले, '...ही माझी इच्छा'.
लोकसभेपूर्वी भाजप-शिंदेंकडून ऑफर, ठाकरेंच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट
लोकसभेपूर्वी भाजप-शिंदेंकडून ऑफर, ठाकरेंच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट.
'मी बीड जिल्ह्याचा बाप, चिंता काय...'; कराडचा आणखी एक ऑडिओ व्हायरल
'मी बीड जिल्ह्याचा बाप, चिंता काय...'; कराडचा आणखी एक ऑडिओ व्हायरल.
'लाडक्या बहिणींमुळे कोटींचा खड्डा, आता तुम्ही ठरवा मोदींच्या की...'
'लाडक्या बहिणींमुळे कोटींचा खड्डा, आता तुम्ही ठरवा मोदींच्या की...'.
'अजित पवारांनी मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर...', दमानियांचं चॅलेंज
'अजित पवारांनी मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर...', दमानियांचं चॅलेंज.
एसटी भाडेवाढीविरोधात ठाकरेंची सेना आक्रमक; आज राज्यभरात आंदोलन
एसटी भाडेवाढीविरोधात ठाकरेंची सेना आक्रमक; आज राज्यभरात आंदोलन.
सिद्दीकी प्रकरणात खुलासा, हत्येपूर्वी लिहिलेल्या डायरीत कोणाची नावं?
सिद्दीकी प्रकरणात खुलासा, हत्येपूर्वी लिहिलेल्या डायरीत कोणाची नावं?.
ऑनलाईन गेमच्या नादात स्वतःचा चिरला गळा, गुगलवर एकच शब्द सतत सर्च
ऑनलाईन गेमच्या नादात स्वतःचा चिरला गळा, गुगलवर एकच शब्द सतत सर्च.