Devendra Fadnavis : एकनाथ खडसे यांच्याबाबत देवेंद्र फडणवीस यांचं अत्यंत महत्त्वाच विधान, पक्षात प्रवेश मिळणार का?
Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीआधी एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून दूर झाले. त्यांनी भाजपा उमेदवार आणि सून रक्षा खडसे यांचा प्रचार केला. त्यानंतर एकनाथ खडसे हे भाजपा प्रवेशाच्या प्रतिक्षेत होते. पक्ष प्रवेश रखडल्याबद्दल त्यांनी मनातली सल बोलून दाखवली होती. आता देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्यावर महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव मिळावा म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमुळे प्रचंड मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. सगळ्यात महत्त्वाच कच्चा तेलावर कुठलीही आयत डुयूटी नव्हती. 20 टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रिफाइंड तेलावर शुल्क 12.5 टक्क्यावरुन 32.5 टक्के करण्यात आलं आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड मोठा फायदा होणार आहे” असं भाजपा नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. “सोयाबीनच्या किंमती वाढण्याकरता बाजारात फायदा होईल. यापूर्वी सोयाबीन खरेदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे सोयाबीन शेतकरी लाभान्वित होणार आहे. कापसाच्या शेतकऱ्याला फायदा मिळणार आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“कांद्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने मिनिमम निर्यात शुल्क संपवून टाकलय. एक्सपोर्ट ड्युटी 40 वरुन 20 टक्के आणली आहे. काद्यांचे भाव स्थिर होण्याकरता मोठा फायदा होईल. कांदा उत्पादक शेतकऱ्याची खूप महत्त्वपूर्ण मागणी केंद्र सरकारने त्याठिकाणी मान्य केलीय. मी केंद्र सरकारच मनापासून अभिनंदन करतो” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “बासमती राईस निर्यातीवरील ड्युटी हटवण्यात आली आहे. त्याचा बासमती धान पिकवणाऱ्या शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल. या सगळ्या निर्णयांचा थेट फायदा सोयाबीन, कांदा, बासमीत उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. त्यासाठी मी केंद्र सरकारचे आभार मानतो” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं नाही’
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला राज्यपालपदाची ऑफर दिली होती, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला. त्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना आज पत्रकारांनी विचारलं. ते म्हणाले की, “ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं नाही. त्यांच्यासंदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतला आहे. तो आम्हाला मान्य आहे. केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करुन गणेशोत्सवानंतर योग्य निर्णय घेतला जाईल” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. पोर्ट ब्लेयरच नाव बदलण्यात आलं. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “ही आनंदाची बाब आहे. मोदी सरकार गुलामीची चिन्ह मिटवण्याच हे जे काम करतय, त्या बद्दल मी त्यांचे आभार मानतो”